NZ vs IND 1st Test: गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाला एक चूक पडू शकते महागात... जाणून घ्या कसं मिळणार WTC Final चं तिकीट?

NZ vs IND 1st Test
NZ vs IND 1st Testpudhari
Published on: 
Updated on: 

NZ vs IND 1st Test WTC Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १९ नोव्हेंबर पासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यापूर्वी दौऱ्यात भारताने टी २० आणि वनडे मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळं या मालिकेत न्यूझीलंड त्वेशाने खेळले यात शंका नाही.

भारतासाठी ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या मालिकेवरच भारताचे आव्हान अबाधित राहणार की संपुष्टात येणार याचा निर्णय होणार आहे. भारताचे wtc मधील अजून ७ सामने शिल्लक आहेत. सध्याच्या घडीला भारताची स्थिती पाहता भारताला एकापेक्षा जास्त पराभव परवडणारे नाहीत. एवढेच काय तर एखादा सामना अनिर्णित जरी राहिला तरी भारतासाठी डोकेदुखीच ठरणार आहे. त्यामुळं येणारा प्रत्येक कसोटी सामना हा करो या मरो अशा पद्धतीनेच खेळावा लागणार आहे. प्रत्येक सामन्यात आपल्याला मोठी ताकद लावावी लागणार आहे.

NZ vs IND 1st Test
WTC 2027 Final Qualification : बांगलादेशचा पराभव भारताच्या पथ्यावर! WTC 2027 फायनलमध्ये टीम इंडिया धडक मारणार का?

भारत WTC मध्ये कुठं?

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ सायकलमध्ये सध्या टीम इंडियाने ११ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ५ जिंकले असून ४ सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. तर २ सामने हे अनिर्णित राहिले आहेत. भारताचे विनिंग पर्सेंटेज हे ५१.३२ असून गुण तालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे.

भारताचे आजून ७ कसोटी सामने शिल्लक आहेत. यातील दोन कसोटी सामने न्यूझीलंडविरूद्ध खेळायचे आहेत. तर ५ कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे.

NZ vs IND 1st Test
IND vs NZ Test : ५८ वर्षांत २ मालिका विजय! न्यूझीलंडमध्ये कशी आहे टीम इंडियाची कसोटी कामगिरी? कर्णधार गिलसमोर मोठे आव्हान

मोठा जोर लावावा लागणार

आता wtc ची फायनल खेळण्यासाठी टीम इंडियाला मोठा जोर लावावा लागणार आहे. जर भारत आपल्या सर्व सात च्या सात सामन्यात विजय मिळतो तर आपण सहज फायलन गाठू. मात्र ओव्हर रेटमुळे जर पॉईंट्स कमी झाले तर स्थिती अवघड होण्याची शक्यता आहे.

जर भारत सहा सामने जिंकला आणि एक सामना ड्रॉ झाला तर विनिग पर्सेंटेज कमी होऊन ६६.६७ टक्के इतकं होईल. जर सहा विजय आणि एक पराभव अशी स्थिती झाली तर विनिंग पर्सेंटेज ६४.८१ टक्के होईल. या सिनोरियोमध्ये फायनलपर्यंत पोहोचण्याची संधी असेल मात्र अजून एक पराभव झाला तर काम तमाम होऊन जाईल. त्यामुळं भारतासाठी चुकीला माफी नाही अशी स्थिती आहे.

NZ vs IND 1st Test
IND vs NZ 5th ODI : २०९ धावा करूनही 'टीम इंडिया'चा थरारक विजय! न्यूझीलंडला २२ धावांनी चीतपट करत मालिका ३-१ ने जिंकली

विशेष म्हणजे भारत आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार आहे. हे दोन संघ सध्या पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. त्यामुळं भारत जिंकला तर थेट त्यांच्या रँकिंगवर परिणाम होणार आहे. त्यांचे विनिंग पर्सेंटेज कमी होणार त्याचा थेट फायदा भारताला होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.