Virat Kohli fitness | "विराट कोहलीकडून शिका!" : फिटनेसवरून रोहित शर्मा-सूर्यकुमार यादवला संजय मांजरेकरांनी दाखवला 'आरसा'

Virat Kohli fitness | वयाची तिशीनंतर शरीरयष्टीकडे दुर्लक्ष केल्‍याने खेळावर परिणाम
Virat Kohli fitness
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव याच्‍या फिटनेसची तुलना विराट कोहलीबरोबर केली आहे. Pudhari.
Published on
Updated on
Summary

विराटच्या फिटनेसवरून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई : "विराट कोहली म्हणजे केवळ जगातील सर्वोत्तम फलंदाजच नाही, तर जागतिक क्रिकेटमधील 'फिटनेस'चा तो एक मापदंड आहे. त्याच्या फिटनेसची चर्चा मैदानापेक्षाही बाहेर अधिक असते. अनेक समकालीन खेळाडूंसाठी तो एक आदर्श ठरला आहे. मात्र, आता याच विराटच्या फिटनेसवरून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना खडे बोल सुनावले आहेत. वयाची तिशी ओलांडल्यानंतर या दोघांनी स्वतःच्या शरीरयष्टीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या खेळावर त्याचा कसा परिणाम होतोय, यावर मांजरेकरांनी सुनावले आहे.

विराटच्‍या यशामागील मुख्‍य कारण त्‍याचा फिटनेस

'स्पोर्टस्टार'च्या पॉडकास्टमध्ये बोलताना मांजरेकर म्हणाले, "विराट कोहलीला सर्व फॉरमॅटमध्ये जे यश मिळालं, त्याचं मुख्य कारण त्याचा फिटनेस आहे. याउलट, रोहित आणि सूर्याला फटका बसला, कारण ते विराटसारखा फिटनेस राखू शकले नाहीत."

Virat Kohli fitness
Shikhar Dhawan | 'क्रिकेटमधील एकाच फॉरमॅटमध्ये खेळताना लय बिघडते' ; रोहित-विराटबाबत शिखर धवनचे मोठे विधान

विराट कोहलीच्या पुस्तकातून एक धडा गिरवा

मांजरेकर म्हणाले. "विराट आता त्याच्या ३० व्या वर्षाच्या सुरुवातीला नाही, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये कठीण काळ पाहिला आहे; पण या सीझनमध्ये त्याच्याकडे पाहा. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या फिटनेसमध्ये कोणता एक मोठा फरक आहे?" या प्रश्‍नावर मांजरेकरांच्‍या मते, सूर्यकुमारकडे अजूनही यशस्वी होण्यासाठी अनुभव आणि कौशल्य आहे, पण 'फिटनेस' हा त्याच्या खेळातील हरवलेला दुवा ठरत आहे.

Virat Kohli fitness
Virat Kohli RCB vs GT: गुजरात टायटन्सची प्रेस कॉन्फरन्स विराटनं केली हायजॅक... काय म्हणाले GT चे कोच दहिया?

'विराटसारखा टोकाचा फिटनेस अंगीकारा'

मांजरेकर यांनी वारंवार कोहलीच्या शिस्तीचा उल्लेख करत आधुनिक क्रिकेटपटूंनी त्याचे अनुसरण केले पाहिजे असे सांगितले. "तुमची फिटनेस पातळी पुढच्या स्तरावर न्या. विराट ज्याप्रमाणे टोकाचा फिटनेस पाळतो, तसे करा. व्हा विराटला कोणतेही यश मिळते, तेव्हा तो त्याचे पहिले श्रेय त्याच्या शारीरिक फिटनेसला देतो.

Virat Kohli fitness
Babar Azam | विराट कोहलीचे नाव ऐकताच बाबर आझमची सटकली! म्हणाला, "ही तुलना ..."

३० पार केलेल्या खेळाडूंसाठी टी-२० क्रिकेट अतिशय कठीण

मांजरेकरांच्या मते, ३० पार केलेल्या खेळाडूंसाठी टी-२० क्रिकेट अतिशय कठीण होत जाते, विशेषतः त्यांच्या शारीरिक क्षमतेत थोडीही घसरण झाली तर. वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमारच्या फॉर्ममधील अलीकडची घसरण ही टी-२० क्रिकेटमधील सर्वात धक्कादायक गोष्टींपैकी एक असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Virat Kohli fitness
Virat Kohli Video: विराट परदेशी खेळाडू आहे का? मुलाखतीत विचारला वादग्रस्त प्रश्न; 'किंग' कोहलीने दिलं सडेतोड उत्तर

मी त्‍याला फक्‍त फिटनेसवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले असते

मांजरेकर म्हणाले. "सूर्यकुमार यादव यादवने टी-२० फलंदाजीवर राज्य केले. त्यानंतर अचानक फॉर्ममध्ये घसरण झाली... सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीनंतर आता सातत्याने अपयश येत आहे. वाढते वय आणि घसरलेला फिटनेस यामुळे सूर्याच्या हाताचा आणि डोळ्यांचा समन्वय बिघडला असावा, ज्याचा फटका त्याच्या 'बिहाइंड द स्क्वेअर' खेळल्या जाणाऱ्या शॉट्सना बसत आहे. कारण फिटनेस जसा असायला हवा तसा नाही. जर मी त्याचा वैयक्तिक प्रशिक्षक असतो, तर मी त्याला फक्त अधिक चपळ आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होण्यावर भर द्यायला लावला असता."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news