Virat Kohli Video: विराट परदेशी खेळाडू आहे का? मुलाखतीत विचारला वादग्रस्त प्रश्न; 'किंग' कोहलीने दिलं सडेतोड उत्तर

Virat Kohli Viral Reaction: विराट कोहलीने RCB इंटरव्ह्यूमध्ये ‘मी परदेशी खेळाडू आहे का?’ या प्रश्नावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. लंडनमध्ये राहण्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर मीम्स व्हायरल होत आहेत.
Virat Kohli Video
Virat Kohli VideoPudhari
Published on
Updated on

Virat Kohli Video: IPL 2026 मध्ये विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद 69 धावांची खेळी करत आपल्या क्लासची झलक दाखवली. मात्र मैदानाबाहेरही त्याचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

RCB इंटरव्ह्यूमध्ये मजेशीर प्रश्न

Royal Challengers Bangalore च्या इनसाइडर शोमध्ये कोहलीला एक हटके प्रश्न विचारण्यात आला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या मीम्सचा संदर्भ देत विचारलं गेलं की, “लोक म्हणत आहेत RCB मध्ये 5 परदेशी खेळाडू खेळत आहेत.” हा प्रश्न ऐकताच कोहलीने लगेच हसत प्रतिक्रिया दिली आणि उलट विचारलं, “मी तो पाचवा खेळाडू आहे का?”

कोहलीची भन्नाट प्रतिक्रिया

या प्रश्नावर कोहली हसत म्हणाला, “तुम्ही मला का विचारताय? परदेशी खेळाडूंनाच विचारा. मी काही परदेशी खेळाडू नाही, तुम्हाला वाटतय का मी परदेशी खेळाडू आहे?” त्याचा हा कूल आणि विनोदी अंदाज चाहत्यांना खूप आवडला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Virat Kohli Video
Shreyas Iyer Fine: दुहेरी शिक्षा... दोन सामन्यात 36 लाखांच नुकसान; श्रेयस अय्यरचं कुठे गंडतय?

लंडनमध्ये राहत असल्यामुळे चर्चा

गेल्या काही काळापासून कोहली आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत असल्याच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. लोक मजेशीरपणे म्हणतात की, “कोहली आता भारतात फक्त IPL खेळण्यासाठी येतो.” या पार्श्वभूमीवरच हा प्रश्न विचारण्यात आला होता.

'लुक’वर कोहलीचं मजेशीर उत्तर

इंटरव्ह्यूदरम्यान त्याला नवीन हेअरस्टाइल आणि टॅटूबद्दलही विचारण्यात आलं. यावर कोहली म्हणाला, “तुम्हाला खरंच वाटतं का की मी IPL मध्ये माझा लुक दाखवायला येतो?” त्याच्या या उत्तरानेही चाहत्यांना हसू आलं.

Virat Kohli Video
IPL Match Cost: स्टेडियमपासून खेळाडूंपर्यंत... IPL च्या एका सामन्यासाठी किती खर्च येतो? आकडा वाचून धक्का बसेल

‘विक्ट्री’ची त्याची व्याख्या

कोहलीने यावेळी ‘विजय’ म्हणजे काय यावरही आपलं मत मांडलं. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मेहनत आणि समर्पण करता आणि त्यात यश मिळवता, तोच खरा विजय असतो.” विराट कोहलीचा हा व्हिडिओ त्याच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news