Sehwag vs Rishabh Pant : ‘ऋषभ पंत फोन हातात घ्यावा, धोनीला कॉल करावा’, सेहवागने असा सल्ला का दिला?

जर पंत धोनीला आपला आदर्श मानत असेल, तर त्याने त्याच्याशी फोनवर बोलले पाहिजे, असेही सेहवाग म्हणाला.
rishabh pant virender sehwag ms dhoni
Published on
Updated on

नवी दिल्ली : लखनौ सुपर जायंटस् संघाने ऋषभ पंतला 27 कोटींना विकत घेऊन कर्णधार केले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी झाला. त्यामुळे त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या; पण तो त्या पूर्ण करू शकला नाही. पंत संपूर्ण हंगामात खराब फॉर्मशी झुंजत आहे. पंजाब किंग्जविरुद्ध 17 चेंडूंत 18 धावा केल्यानंतर तो बाद झाला. तर या हंगामात तो 11 सामन्यांमध्ये 12.8 च्या सरासरीने आणि 99 च्या स्ट्राईक रेटने फक्त 128 धावा करू शकला.

पंतची कामगिरी पाहून टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पंतला त्याच्या लयीत परतण्यासाठी धोनीची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.

rishabh pant virender sehwag ms dhoni
Virat Kohli Avneet Kaur : कोहलीच्या ‘फोटो लाईक’ वादानंतर अवनीत कौरला लागली लॉटरी! इंस्टा पोस्टच्या दरात 30 टक्के वाढ

ज्या खेळींमध्ये ऋषभ पंतने भरपूर धावा केल्या आहेत, त्या खेळींचे व्हिडीओ पुन्हा बघण्याचा सल्ला वीरेंद्र सेहवागने पंतला दिला आहे. ‘क्रिकबझ’वर लखनौ सुपर जायंटस् आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याचे विश्लेषण करताना त्याने हा सल्ला दिला.

rishabh pant virender sehwag ms dhoni
Jasprit Bumrah IND vs ENG Test Series : बुमराहचा होणार पत्ता कट! नेतृत्वाच्या शर्यतीत शुभमन गिल मारणार बाजी, इंग्लंड दौऱ्यासाठी नवा मास्टरप्लॅन

दुखापतीनंतर ऋषभ पंतचा फॉर्म गेला आहे. त्याला पूर्वीसारखी फलंदाजी करता येत नाहीये, असेही तो म्हणाला. जर पंत धोनीला आपला आदर्श मानत असेल, तर त्याने त्याच्याशी फोनवर बोलले पाहिजे, असेही सेहवाग म्हणाला.

rishabh pant virender sehwag ms dhoni
IPLमध्ये फक्त 1 रनने सामना गमावणारे संघ

‘ऋषभ पंतला जर वाटत असेल की, तो स्वत: नीट विचार करू शकत नाही, तर त्याला मदत करणारे अनेक क्रिकेटपटू आहेत. त्याच्याकडे फोन आहे. त्याने फोन हातात घ्यावा आणि वाटेल त्या कोणालाही फोन करावा. जर तो धोनीला त्याचा आदर्श मानत असेल, तर त्याने धोनीशी बोलले पाहिजे,’ असाही सल्ला सेहवागने दिला आहे.

rishabh pant virender sehwag ms dhoni
IPL इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज

पंत हार मानणार नाही : रायडू

माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूने पंतच्या खराब फॉर्मबद्दल दुःख व्यक्त केले; पण त्याने पंतला हार न मानणारा खेळाडू म्हटले. तो म्हणाला की, पंतच्या धावा होत नसल्या, तरीही तो आपल्या जुन्या पद्धतीनेच खेळतोय. फॉर्म जाणे हा टप्पा सर्व खेळाडूंच्या बाबतीत घडतो. परंतु, आशा आहे की, तो अशा परिस्थितीत हार मानणार नाही. पंतकडे मधल्या फळीत खेळण्याचे कौशल्य आहे; पण ते योग्यरीत्या अंमलात आणण्याची मानसिकता त्याच्याकडे सध्या नाही. तो लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास अंबाती रायडूने व्यक्त केला.

rishabh pant virender sehwag ms dhoni
ICC Annual Rankings 2025 : वनडे, टी-20 मध्ये टीम इंडियाचा दबदबा! कसोटीत रोहितसेनेचे नुकसान, कांगारूंची मोठी झेप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news