IPL 2026: RCB विरुद्ध SRH सामन्यासाठी आजपासून ऑनलाइन तिकीट विक्री सुरू; किंमत आणि बुकिंग कशी करायची जाणून घ्या

RCB vs SRH Tickets IPL 2026: IPL 2026 च्या पहिल्या सामन्यासाठी RCB vs SRH तिकिट विक्री सुरू झाली आहे. तिकिटे फक्त RCB च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून किंमत ₹3,750 पासून सुरू होते.
RCB vs SRH Tickets IPL 2026
RCB vs SRH Tickets IPL 2026Pudhari
Published on
Updated on

IPL 2026 RCB vs SRH Tickets Now Live: IPLचा थरार २८ मार्चपासून सुरू होत असून पहिला सामना Royal Challengers Bangalore आणि Sunrisers Hyderabad यांच्यात होणार आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या हाय-व्होल्टेज सामन्याच्या ऑनलाइन तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली आहे.

या सामन्यात एकीकडे अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि हेनरिक क्लासेनसारख्या धडाकेबाज फलंदाजांची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे विराट कोहलीची फलंदाजी स्टेडियममध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे या सामन्याची ऑनलाईन तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळू शकते.

तिकिटे कुठे मिळणार?

या सामन्याची तिकिटे BookMyShow किंवा इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसून फक्त RCB च्या अधिकृत वेबसाइट आणि अ‍ॅपवरच विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. फ्रँचायझीने स्पष्ट इशारा दिला आहे की, बनावट वेबसाइट्सपासून सावध राहा आणि केवळ अधिकृत माध्यमातूनच तिकिटे खरेदी करा.

तिकिट बुकिंगची प्रक्रिया कशी?

तिकिट बुक करण्यासाठी चाहत्यांनी RCB च्या अधिकृत बुकिंग प्लॅटफॉर्मवर लॉगिन करून आपल्या पसंतीचा स्टँड आणि सीट निवडायची आहे. त्यानंतर तिकिटांची संख्या निवडून पेमेंट पूर्ण केल्यावर ई-तिकिट मिळणार आहे.

RCB vs SRH Tickets IPL 2026
Kevin Pietersen IPL XI: रोहित-हार्दिक बाहेर, धोनीच कर्णधार! केविन पीटरसनने निवडला आयपीएलचा 'ऑल टाइम इलेव्हन'

तिकिटांचे दर किती?

या सामन्याचे तिकिट ३,७५० रुपयांपासून सुरू होतात. प्रीमियम आणि व्हीआयपी सीट्ससाठी किंमती मोठ्या प्रमाणात वाढतात. सर्वात महाग तिकिट सुमारे ४७,००० रुपयांपासून सुरू होत असून डायनॅमिक प्राइसिंगनुसार तिकिट ६५,८०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. प्लॅटिनम लाउंज तिकिटांची किंमत २५,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान आहे.

RCB vs SRH Tickets IPL 2026
Arjun Tendulkar IPL 2026: अर्जुन तेंडुलकरला संधीच नाही? अश्विनच्या वक्तव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाला?

विशेष सुविधा काय?

RCB ने चाहत्यांसाठी एक खास सुविधा जाहीर केली आहे. ज्यांच्याकडे सामन्याचे तिकिट असेल, त्यांना सामन्याच्या दिवशी मेट्रोने मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे स्टेडियमपर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. IPL 2026 च्या पहिल्या सामन्याबद्दल प्रचंड उत्साह असून तिकिटांसाठी मोठी मागणी अपेक्षित आहे. त्यामुळे वेळेत तिकिट बुक करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news