T20 World Cup 2026 Qualification: पाकिस्तानचाही टी २० वर्ल्डकपमधून पत्ता कट...? ही टीम होऊ शकते क्वालिफाय

गेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये देखील युएसएने पाकिस्तानला ग्रुप स्टेजमधूनच घरचा रस्ता दाखवला होता.
T20 World Cup 2026 Qualification
T20 World Cup 2026 QualificationPudhari photo
Published on
Updated on

T20 World Cup 2026 Qualification: पाकिस्तानचा यंदाच्या टी २० वर्ल्डकपमधील ग्रुप स्टेजमधील प्रवास अडखळता झाला आहे. सलमान आगाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीम आज (दि. १८ फेब्रुवारी) टी २० वर्ल्डकप २०२६ मधील ग्रुप स्टेजमधील आपला शेवटचा सामना खेळणार आहे. त्यांचा हा सामना नामिबियासोबत आहे. पाकिस्तान गेल्या सामन्यात भारताकडून पराभूत झाला आहे.

त्यामुळं पाकिस्तानवर टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार लटकत आहे. जर आज मोठा उलटफेर झाला तर पाकिस्तान सुपर ८ साठी पात्र होणार नाही. गेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये देखील युएसएने पाकिस्तानला ग्रुप स्टेजमधूनच घरचा रस्ता दाखवला होता.

T20 World Cup 2026 Qualification
T20 World Cup 2026: कॅनडाचा 'युवराज' नावाला जागला... युवराज सिंगवरून नाव ठेवलेल्या १९ वर्षाच्या फलंदाजानं इतिहास रचला

कसं आहे पॉईंट टेबल?

पॉईंट टेबलवर नजर टाकली तर ग्रुप A मधून आतापर्यंत सुपर ८ मध्ये फक्त एकच संघ पोहचला आहे. तो म्हणजे भारत! भारतानं ग्रुप स्टेजमधील आपले तीनही सामने जिंकून टेबल टॉप केलं आहे. तर दुसऱ्या स्थानावर युएसए असून त्यांनी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना दोन सामन्यात पराभव देखील पत्करावा लागला आहे. युएसएच्या खात्यात ४ गुण आहेत.

पाकिस्तान गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान जर आज नामिबियाविरूद्ध जिंकला तर त्यांचे सहा गुण होतात आणि ते सुपर ८ मध्ये थेट क्वालिफाय होतात. मात्र जर त्यांना हा सामना गमवावा लागला तर त्यांना थेट घरचा रस्ता धरावा लागणार आहे.

T20 World Cup 2026 Qualification
T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या वादळात कॅनडाचा पालापाचोळा, किवी संघाची 'सुपर-८'मध्ये धडक

तर नेट रनरेट ठरवणार कोण जाणार

पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामन्यात विजय मिळवला आहे. ते क्वालिफिकेशनच्या अत्यंत जवळ आहेत. त्यांनी नेदरलँड्सला ३ विकेट्सनी हरवलं होतं तर युएसएला ३२ धावांनी पराभूत केलं होतं. पाकिस्तान भारताकडून ६१ धावांनी पराभूत झाला होता. त्यामुळं त्यांच्या धावगतीवर याचा विपरित परिणाम झाला आहे.

पाकिस्तानचे नेट रनरेट हे ०.४०३ इतकं आहे तर युएसएचे +०.७८७ इतकं आहे. जर आज पाकिस्तान हरला तर युएसए आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे गुण हे प्रत्येकी ४ होतील. त्यावेळी कोणता संघ पात्र होईल हे नेट रनरेटवर निश्चित केलं जाईल. सध्याच्या घडीला युएसएचे नेट रनरेट हे पाकिस्तानपेक्षा चांगलं आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत युएसएला सुपर ८ मध्ये पात्र होण्याची जास्त संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news