NZ vs IND 1st Test DRS Row: अल्ट्रा एजवर स्पाईक, मात्र कॅमेरा अँगलमध्ये वेगळंच दिसलं; हुज्जत घातली, गिलनं DRS अन् आघाडी गमावली

Shubman Gill Jasprit Bumrah DRS : शुभमन गिलने पंचांची घातली हुज्जत... एका DRS चा भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे.
NZ vs IND 1st Test DRS Row:
NZ vs IND 1st Test DRS Row:pudhari
Published on: 
Updated on: 

NZ vs IND 1st Test DRS Raw: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने दमदार गोलंदाजी करत यजमान किवींची दैना उडवून दिली होती. मात्र त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि हेन्री निकोल्स दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. न्यूझीलंडने ५ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली आहे.

NZ vs IND 1st Test DRS Row:
NZ vs IND 1st Test: गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाला एक चूक पडू शकते महागात... जाणून घ्या कसं मिळणार WTC Final चं तिकीट?

निर्णयही विरोधात DRS ही गेला

दुसऱ्या सत्रापर्यंत बुमराहने तीन विकेट्स मिळवल्या होत्या. जसप्रीत बुमराहने आपला चौथा बळी टिपलाच होता. मात्र एक डीआरएसने सगळं चित्रच पालटलं. तिसऱ्या अंपायरने अल्ट्रा एज अन् काही कॅमेरा अँगल पाहिले अन् फलंदाजाला नाबाद ठरवलं. अल्ट्रा एजमध्ये चेंडू बॅटला लागल्याचं दिसत होतं.

मात्र पुढच्या कॅमेऱ्या अँगलमध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही असं दिसत होतं. चेंडू आत येत होता. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने मैदानावरील पंचांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्णय तिसऱ्या पंचाचा असल्यामुळे त्याला काही करता आलं नाही. दुसरं म्हणजे गिलचा एक डीआरएस देखील गमावला.

NZ vs IND 1st Test DRS Row:
IND vs NZ Test : ५८ वर्षांत २ मालिका विजय! न्यूझीलंडमध्ये कशी आहे टीम इंडियाची कसोटी कामगिरी? कर्णधार गिलसमोर मोठे आव्हान

३१ व्या षटकात नेमकं काय घडलं

ही डीआरएसची घटना ३१ व्या षटकात घडली. बुमराहने ग्लेन फिलिप्सला षटकातील तिसरा चेंडू टाकला. हा चेंडू त्याच्या बॅटच्या जवळून जाऊन थेट पॅडवर लागला. त्यावेळी बुमराह अन् टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. मात्र पंचांनी ग्लेनला नाबाद ठरवलं. यानंतर गिलने डीआरएस घेत तिसऱ्या पंचांकडे या निर्णयाविरूद्ध दाद मागितली.

NZ vs IND 1st Test DRS Row:
IND vs NZ : कसोटी मालिकेसाठी BCCIकडून टीम इंडियात मोठे बदल; कुलदीप यादव 'आऊट', 'या' युवा गोलंदाजाला मिळाली संधी

तिसऱ्या पंचांचा निर्णय

तिसऱ्या पंचांच्या पडताळणीत बुमराहने टाकलेला चेंडू ग्लेनच्या बॅटच्या जवळून जात होता असं दिसतं. मात्र त्याचवेळी अल्ट्रा एजमध्ये एक मोठा स्पाईक दिसला. अल्ट्रा एज पाहिला तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्याचं दिसतं. मात्र फ्रंड ऑन रिप्ले पाहिला तर तसं दिसत नाही. तिसरे पंच पॉल रीफेल यांनी सांगितलं की त्यांना एका रिप्लेतून जास्त मदत मिळाली नाही. त्यांनी दुसरा रिप्ले अत्यंत संथ करून पाहिला. त्यांना वाटलं की चेंडू थोडा डिफ्लेक्ट झाला आहे. त्यामुळे ते फिल्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांच्या ग्लेन फिलिप्सला नाबाद ठरवणाऱ्या निर्णयासोबत गेले. यावरून गिल नाराज झाला अन् त्यानं मैदानावरील पंचांशी हुज्जत घातली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. ग्लेन नाबाद राहिला अन् डीआरएस देखील गमावला.

NZ vs IND 1st Test DRS Row:
Jasprit Bumrah : पाकिस्‍तानी क्रिक्रेटपटूने उधळली बुमराहवर स्‍तुतीसुमने;पण म्‍हणाला, "त्‍याला अजूनही..."

न्यूझीलंडचे जोरदार पुनरागमन

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्या दिवशी ७० षटकात ५ बाद २१४ धावा केल्या होत्या. हेन्री निकोल्सने दमदार शतक तर ग्लेन फिलिप्सने शतकाच्या उंबरठ्यावर आहे. भारताकडून आतापर्यंत बुमराहने ३ तर आकाशदीप आणि अंशुल कुंभोज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. निकोल्स आणि फिलिप्स यांनी जीवनदानाचा चांगला फायदा उचलत अडचणीत आलेला न्यूझीलंडचा डाव सावरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.