IND vs NZ : कसोटी मालिकेसाठी BCCIकडून टीम इंडियात मोठे बदल; कुलदीप यादव 'आऊट', 'या' युवा गोलंदाजाला मिळाली संधी

IND vs NZ Test Series Squad Update : १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार
IND vs NZ Test Series Squad Update
IND vs NZ Test Series Squad Update Pudhari News
Published on: 
Updated on: 

IND vs NZ Test Series Squad Update : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकाIND vs NZ Test series squad update : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात मोठा बदल केला आहे. पुरुष निवड समितीने कुलदीप यादवला संघातून वगळले असून, त्याच्या जागी गुरनूर ब्रारची निवड केली आहे.

कुलदीप यादवला कसोटी संघातून मुक्त

शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयने म्हटले आहे की, "पुरुष निवड समितीने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी वेलिंग्टन येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात गुरनूर ब्रारचा समावेश केला आहे. कुलदीप यादवला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले असून, तो आता भारतातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होईल." दरम्यान, गुरनूरची कसोटी संघात निवड झाल्याने तो पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी त्याच्या जागी अन्य कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही.

IND vs NZ Test Series Squad Update
Kapil Dev : "तो विनोद कांबळीसारखा गायब न व्हावा..." : वैभव सूर्यवंशीबाबत माजी क्रिकेटपटू कपिल देव नेमकं काय म्हणाले?

१९ नोव्हेंबरपासून सुरू होणार न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिका

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिली कसोटी १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर सुरू होईल, तर दुसरी कसोटी २७ नोव्हेंबरपासून ख्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळवली जाईल.

IND vs NZ Test Series Squad Update
Sunil Gavaskar : "हे खेळ भावनेच्या विरोधात..." ; वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर सुनील गावस्‍कर का संतापले?

पंतसोबतच ध्रुव जुरेलचाही यष्टिरक्षक संघात समावेश

याव्यतिरिक्त, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत वेलिंग्टनमध्ये कसोटी संघात सामील झाला आहे. पंतसोबतच ध्रुव जुरेलचाही यष्टिरक्षक म्हणून अद्ययावत संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs NZ Test Series Squad Update
kapil dev : ‘इतर खेळाडूंनाही यातून प्रेरणा मिळेल’; भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनावर कपिल देव नेमकं काय म्हणाले?

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि गुरनूर ब्रार.

IND vs NZ Test Series Squad Update
Sunil Gavaskar : रोहितच्या ९२ धावांवर सुनील गावस्‍कर नाराज!; 'हिटमॅन'च्या निवृत्तीबद्दल व्यक्त केली अनोखी इच्छा!

पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर/उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, रुतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, आणि कुमार कुशाग्र (विकेटकीपर).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.