

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीतील (क्वालिफायिंग राऊंड) पहिल्याच प्रयत्नात त्याने ८४.८५ मीटर दूर भाला फेकून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अंतिम फेरीतील प्रवेशासाठी ८४.५० मीटरचा किमान निकष निर्धारित करण्यात आला होता, आणि गतविजेत्या नीरजने हा अडथळा सहज पार केला. अंतिम फेरीचे विजेतेपद मिळवण्यासाठी तो एक प्रमुख दावेदार मानला जात आहे. स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी (१८ सप्टेंबर) होणार आहे.
नीरज चोप्रा पात्रता फेरी पहिल्याच प्रयत्नात पार करण्यासाठी जगभरात ओळखला जातो. २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमध्येही त्याने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवून सुवर्णपदक जिंकले होते. तसेच, २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्येही पहिल्याच फेकीत पात्र ठरत त्याने रौप्यपदक पटकावले. २०२२ आणि २०२३ च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही त्याने अशीच कामगिरी केली आहे.
नीरज चोप्राने आतापर्यंत एकदाच जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले आहे. २०२३ मध्ये त्याने अव्वल स्थान पटकावले होते, तर २०२२ मध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला. २०२३ मध्ये नीरजने ८८.१७ मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले होते, तर पाकिस्तानचा अर्शद नदीम ८७.८२ मीटर फेकीसह दुसऱ्या स्थानावर राहिला होता. तर याकुब वडलेच (८६.६७ मीटर) तिसऱ्या क्रमांकावर होता.
नीरज चोप्राने आतापर्यंत एकदाच जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले आहे. २०२३ मध्ये त्याने अव्वल स्थान पटकावले होते, तर २०२२ मध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला. गेल्या महिन्यात झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याला विजेतेपद मिळवता आले नाही. त्यावेळी ८५.०१ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह तो दुसऱ्या स्थानावर राहिला, तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ९१.५१ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह अव्वलस्थान पटकावले होते.
निरज हा यंदाच्या स्पर्धेत गतविजेता म्हणून सहभागी झाला आहे. जान झेलेझनी (१९९३, १९९५) आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स (२०१९, २०२२) नंतर सलग दोनदा जागतिक भालाफेक विजेतेपद जिंकणारा तो इतिहासातील तिसरा खेळाडू बनण्याचा प्रयत्न करेल.
गेल्या महिन्यात झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याला विजेतेपद मिळवता आले नाही. त्यावेळी ८५.०१ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह तो दुसऱ्या स्थानावर राहिला, तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ९१.५१ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह अव्वलस्थान पटकावले होते.