MS Dhoni: 'धोनीला बाहेर बसण्यास कोणीही सांगू शकत नाही': CSK च्या माजी खेळाडूने सांगितलं धक्कादायक वास्तव

IPL 2026 news: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
MS Dhoni
MS Dhonifile photo
Published on
Updated on

MS Dhoni IPL 2026 news

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. "एमएस धोनीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणे चेन्नईच्या व्यवस्थापनासाठी अशक्य आहे," असा खळबळजनक दावा भारताचा माजी फलंदाज आणि धोनीचा जुना सहकारी सुब्रमण्यम बद्रीनाथ याने केला आहे.

MS Dhoni
IPL 2026 : धोनीची CSK अडचणीत! 'जेलर' आणि 'कुली'च्या संगीताचा विनापरवाना वापर; रजनीकांत यांच्या गाण्यांचा वाद थेट न्यायालयात

फ्लेमिंगही धोनीला 'ड्रॉप' करू शकत नाही!

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बद्रीनाथने ड्रेसिंग रूममधील वास्तवावर बोलताना तो म्हणाला, "सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनी सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. पण मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग धोनीला जाऊन असं सांगू शकतील का की, 'तू या सामन्यात खेळणार नाहीस, आम्ही तुला ड्रॉप करत आहोत'? मला नाही वाटत की फ्लेमिंगमध्ये तसं करण्याची हिंमत असेल. जगातला कोणताही सपोर्ट स्टाफ धोनीला तू 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून खेळ किंवा बाहेर बस, असं सांगूच शकत नाही."

मैदानावरील धोनीचा दबदबा

२०२५ च्या आयपीएल हंगामात ४४ वर्षीय धोनीची कामगिरी संमिश्र राहिली होती. त्याने १४ सामन्यांत २४.५० च्या सरासरीने आणि १३५.१७ च्या स्ट्राईक रेटने १९६ धावा केल्या होत्या. बहुतेक वेळा तो अखेरच्या षटकांत फलंदाजीला येत असे. असे असूनही, धोनीचे संघातील स्थान आणि त्याचे वलय पाहता त्याला संघाबाहेर ठेवणे व्यवस्थापनासाठी कठीण असल्याचे बद्रीनाथने नमूद केले.

नक्की भूमिका काय?

फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की, धोनी संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असेल. मात्र, तो यष्टीरक्षक म्हणून खेळणार की 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून, याचा निर्णय संघ व्यवस्थापन परिस्थितीनुसार घेईल. बद्रीनाथच्या मते, धोनीचा आदर आणि त्याचे स्थान इतके मोठे आहे की, तो स्वतःहून निर्णय घेतल्याशिवाय त्याला कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे आगामी हंगामात धोनी सर्व सामन्यांमध्ये मैदानावर दिसेल, अशी दाट शक्यता आहे.

MS Dhoni
Rohit-Virat ODI : चाहत्यांची चंगळ! रोहित-विराट यांच्यामुळे वाढणार वन डे सामन्यांची संख्या, BCCIकडून ‘खास’ तयारी सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news