

Krunal Pandya Nicholas Pooran Controversy: आयपीएल २०२६ यांच्यातील लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर कृणाल पांड्या आणि निकोलस पूरन यांच्यात वाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावेळी लखनौ सुपर जायंट्सचा डावखुरा फलंदाज पूरन हा फलंदाजीला आला होता त्यावेळी आरसीबीचा डावखुरा फिरकीपटू कृणाल पांड्याने त्याला थेट बाऊन्सर टाकला.
पुढच्या चेंडूवर पूरनने सिंगल घेतली. यानंतर कृणाल आणि पूरनने शब्दांची देवाण घेवाण केली. त्यानंतर पुरन नॉन स्ट्राईकला पोहचला. यानंतर फारसं काही घडलं नाही. दोघांनी देखील हे संपवल्याचं दिसलं.
मात्र सामना झाल्यानंतर दोन दिवसांनी नवीन क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. पांड्या आणि पूरन एकमेकांसोबत बोलत होते. त्याचवेळी पूरनने कृणाल पांड्यासोबत बोलताना हातवारे करत होता. त्यानंतर भारतीय पूरनने कृणालची थेट कॉलरच पकडली.
लखनौ सुपर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर या दोघांच्या संभाषणात मधे येत असल्याचं देखील सोशल मीडियावर दिसत आहे. मात्र असं असलं तरी या प्रकरणाबाबत फारशी काळजी करण्याचं कारण नाही. कारण व्हिडिओतच पुढं हे दोघे हसताना आणि सामान्य चर्चा करताना दिसतात.
मात्र याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं पांड्या आणि पूरनमध्ये नेमकं काय झालं आहे असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला, या दोघांमध्ये वाद झाला होता का अशी शंका चाहत्यांच्या मनात आली असून याबाबत कृणाल पांड्याने खुलासा केला आहे.
कृणाल पांड्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पूरनसोबतचा एक फोटो शेअर केला असून त्याने कोणताही लफडा (वाद) झाला नसल्याचं सांगितलं.
तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, 'माझा भाऊ निकोलस पूरनने १०० आयपीएल सामने पूर्ण केले आहेत त्याचे अभिनंदन, कोणताही लफडा नाही फक्त प्रेम. तुझा अभिमान आहे भावा, अशीच कामगिरी करत रहा. पण तो बाऊन्सर कसा होता?'
पूरनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने देखील कमेंट करत कृणाल पांड्या आणि त्याच्यात कोणता वाद झालेला नाही. आम्ही जे काही केलं ते चेष्टेत होतं अशी प्रतिक्रिया दिली.
निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या हे दोघे लखनौ सुपर जायंट्सकडून एकत्र खेळले आहेत. त्यांनी २०२३ आणि २०२४ च्या हंगामात एकत्र ड्रेसिंग रूम शेअर केली आहे.