ICC स्पर्धेसाठी जपान क्रिकेट संघ पात्र! शेवटच्या 2 संघांसाठी थरारक लढत

जपानने क्वालिफायर फेरीत पापुआ न्यू गिनी आणि फिजी या संघांविरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळले आणि सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला.
japan cricket team ICC U19 Men's Cricket World Cup 2026
Published on
Updated on

japan cricket team icc u19 men's cricket world cup 2026

दुबई : आयसीसी स्पर्धा खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेट संघ पाहतो, परंतु काही निवडक संघांचेच हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. यात याता जपानच्या क्रिकेट संघाने बाजी मारली आहे. जपान संघाने आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवली आहे. ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायरमध्ये सर्व 4 सामने जिंकत त्यांनी अंडर-19 विश्वचषकाचे तिकीट मिळवले.

जपानने क्वालिफायर फेरीत पीएनजी म्हणजेच पापुआ न्यू गिनी आणि फिजी या संघांविरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळले आणि सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला. अशा प्रकारे जपानचा संघ 8 गुणांसह अंडर-19 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा 14 वा संघ ठरला. प्रादेशिक क्वालिफिकेशनद्वारे अंडर-19 विश्वचषकात स्थान मिळवणारा तो तिसरा संघ आहे. यापूर्वी टांझानियाने आफ्रिका क्वालिफायर आणि अफगाणिस्तानने आशिया क्वालिफायर जिंकून आपली जागा पक्की केली आहे.

japan cricket team ICC U19 Men's Cricket World Cup 2026
IPL 2025 KKR Andre Russell : KKRमध्ये आंद्रे रसेलच्या गेमचेंजर गोलंदाजीचा ‘गेम’ कोणी केला?

जपान दुसऱ्यांदा स्पर्धेत दिसणार

जपानने दुसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी जपानच्या क्रिकेट संघाने 2020 मध्ये झालेल्या स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता, पण त्यांना 6 सामने खेळून एकही विजय मिळवता आला नव्हता. यावेळी जपानचा प्रयत्न स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्याबरोबरच आपल्या कामगिरीने क्रिकेट विश्वाला प्रभावित करण्याचा असेल.

japan cricket team ICC U19 Men's Cricket World Cup 2026
Mumbai Indians Top 5 Bowler : मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, बुमराह पोहोचला मलिंगाच्या जवळ

आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषक 2026 चे आयोजन

आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचे आयोजन पुढील वर्षी झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होतील. आतापर्यंत 14 संघांनी या विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे. आता फक्त अमेरिका आणि युरोप क्षेत्रातून क्वालिफिकेशनद्वारे 2 संघ निश्चित होणे बाकी आहे.

japan cricket team ICC U19 Men's Cricket World Cup 2026
IPL 2028 Matches : 2028च्या IPLमध्ये रंगणार 94 सामने? BCCI घेणार मोठा निर्णय

अंडर-19 विश्वचषकात टॉप-10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांनी पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत आपली जागा आधीच पक्की केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या संघांचा समावेश आहे. दरम्यान, झिम्बाब्वे यजमान म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल.

japan cricket team ICC U19 Men's Cricket World Cup 2026
IPL 2025 RCB Performance : आरसीबीची सुवर्ण विक्रमाकडे वाटचाल! IPLच्या इतिहासात ‘असे’ आजपर्यंत कोणत्याच संघाला जमलेले नाही

ICC U19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 साठी पात्र ठरलेले संघ :

झिम्बाब्वे (यजमान), ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, वेस्ट इंडीज, आयर्लंड, पाकिस्तान, टांझानिया, अफगाणिस्तान, जपान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news