

ipl mumbai indians top 5 most wickets taking bowler
मुंबई : जसप्रीत बुमराह हा आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 142 सामन्यांमध्ये आतापर्यंत 177 विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध रविवारी त्याने 4 विकेट्स घेतल्या. यासह बुमराह आता मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगापासून फक्त 18 विकेट्स मागे आहे.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्याने 139 सामन्यांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगा आता आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून दिसत नाही. त्याने मुंबई इंडियन्ससाठी आपला शेवटचा आयपीएल सामना 2019 मध्ये खेळला होता. सध्या तो मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
मुंबई इंडियन्सच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत हरभजन सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. भज्जीने संघासाठी 158 सामन्यांमध्ये 147 विकेट्स घेतल्या आहेत.
आपल्या लांबलचक सिक्सरमुळे विशेष ओळख निर्माण करणारा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 211 सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. पोलार्ड सध्या मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे.
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल मॅकक्लॅशन हा मुंबई इंडियन्सचा पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने एमआयसाठी फक्त 56 सामने खेळून 71 विकेट्स घेतल्या आहेत.