Ishan Kishan SRH : ईशान किशनचे कर्णधारपद जाणार; हैदराबाद सनरायझर्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर

इशान आगामी काही सामन्यानंतर केवळ एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार
Ishan Kishan SRH : ईशान किशनचे कर्णधारपद जाणार; हैदराबाद  सनरायझर्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर
Published on
Updated on

हैदराबाद : आयपीएलच्या चालू हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघात लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सने तंदुरुस्ती चाचणी (फिटनेस टेस्ट) यशस्वीपणे पूर्ण केली असून, तो लवकरच संघात परतणार आहे. परिणामी, सध्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या ईशान किशनकडून ही जबाबदारी काढून घेतली जाईल आणि तो आगामी काही सामन्यानंतर केवळ एक खेळाडू म्हणून मैदानात उतरेल.

कमिन्स लवकरच भारतात येणार

सनरायझर्स हैदराबादने या हंगामासाठी पॅट कमिन्सची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात खेळता आले नाही. 'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, कमिन्स आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून गोलंदाजीसाठी सज्ज आहे. बुधवारी सिडनी येथे झालेल्या स्कॅन अहवालात त्याची दुखापत पूर्णपणे बरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तो १७ एप्रिल रोजी भारतात दाखल होऊन संघात सामील होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ishan Kishan SRH : ईशान किशनचे कर्णधारपद जाणार; हैदराबाद  सनरायझर्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर
Rohit Sharma IPL OUT : मुंबई इंडियन्सला मोठा झटका; दुखापतीमुळे रोहित शर्मा बाहेर

पुढील दोन सामन्यांत ईशानच करणार नेतृत्व

आयपीएलच्या सुरुवातीला पॅट कमिन्स भारतात आला होता, परंतु पूर्ण तंदुरुस्त नसल्याने त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाला जावे लागले होते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) त्याला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. हैदराबादचा पुढील सामना १८ एप्रिल रोजी घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) होणार आहे, तर त्यानंतर २१ एप्रिलला त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही सामन्यांत कमिन्स खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे २५ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून तो मैदानात पुनरागमन करून नेतृत्वाची सूत्रे हाती घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Ishan Kishan SRH : ईशान किशनचे कर्णधारपद जाणार; हैदराबाद  सनरायझर्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर
R Ashwin Support Ruturaj : ‘धोनी तरी कुठे प्रत्येक सामन्यात धावा करतो?’; ऋतुराजच्या समर्थनासाठी अश्विन धावला

गुणतालिकेतील स्थान आणि आव्हाने

ईशान किशनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत ५ सामने खेळले असून, त्यापैकी २ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ३ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या ४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हैदराबादसाठी आगामी सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कमिन्सचे पुनरागमन संघासाठी दिलासादायक मानले जात असले, तरी तो मैदानात परतल्यानंतर संघाची कामगिरी कशी उंचावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news