IPL Salary: आयपीएलमध्ये RCBच्या 'या' खेळाडूला मिळणार 150 कोटी रुपये; धक्कादायक दाव्याने सोशल मीडियावर चर्चा

IPL Players Salary: ललित मोदी यांनी IPL मध्ये 2030 पर्यंत खेळाडूंना 150 कोटींपर्यंत मानधन मिळू शकते, असा दावा केला आहे. फ्रँचायझींचं बजेट मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
IPL Salary
IPL SalaryPudhari
Published on
Updated on

IPL Players Salary: इंडियन प्रीमियर लीग म्हणजे पैशांचा आणि ग्लॅमरचा पाऊस. पण आता या लीगमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाबाबत एक धक्कादायक अंदाज समोर आला आहे. IPL चे माजी प्रमुख ललित मोदी यांनी केलेल्या विधानामुळे क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आलं आहे.

‘150 कोटींचा खेळाडू’

ललित मोदी यांच्या मते, 2030 पर्यंत IPL मध्ये टॉप खेळाडूंना एका सिझनसाठी तब्बल 150 कोटी रुपये मिळू शकतात. सध्या सर्वाधिक महागडा खेळाडू 25-27 कोटींच्या आसपास असताना हा अंदाज खूपच मोठा मानला जात आहे.

फ्रँचायझी बजेट वाढणार

मोदी यांनी सांगितलं की, 2030 पर्यंत फ्रँचायझींची ‘प्लेयर पर्स’ सुमारे 100 मिलियन डॉलर (सुमारे 900 कोटी रुपये) होऊ शकते. याचा अर्थ एका सामन्यासाठीही खेळाडूंना कोट्यवधींचं मानधन मिळू शकतं.

जैकब बेथेल – भविष्यातील सुपरस्टार?

मोदी यांनी विशेषतः जैकब बेथेल या इंग्लंडच्या युवा ऑलराउंडरचं उदाहरण दिलं. त्यांच्या मते, बेथेलसारखे खेळाडू पुढील काही वर्षांत IPL मध्ये सर्वाधिक कमाई करु शकतात.

IPL मध्ये बेथेलची एन्ट्री

21 वर्षीय बेथेलने Royal Challengers Bengaluru कडून IPL मध्ये पदार्पण केलं. कमी संधी मिळूनही त्याने आक्रमक फलंदाजी करत आपली छाप पाडली आहे.

IPL Salary
Mumbai Indians: इतिहासाची पुनरावृत्ती! मुंबई इंडियन्ससाठी KKR ‘लकी चार्म’, कमबॅक होणार का?

आकडे काय सांगतात?

सध्या IPL मध्ये टॉप खेळाडूला 27 कोटी रुपये आणि परदेशी खेळाडूला 25 कोटी रुपये दिले जातात. पण 150 कोटींचा अंदाज म्हणजे IPL आर्थिकदृष्ट्या आणखी मोठ्या उंचीवर जाणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

IPL Salary
Who Is LizLaz: विराट कोहलीच्या एका लाइकमुळे सोशल मीडियावर राडा; कोण आहे जर्मन इन्फ्लुएंसर लिजलाज?

सोशल मीडियावर चर्चा

ललित मोदींच्या या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींना हा अंदाज वास्तव वाटतो, तर काही जण याला अतिशयोक्ती म्हणत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news