

Mumbai Indians Performance IPL: IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण गेल्या दोन हंगामांमध्ये ही टीम सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अडखळताना दिसत आहे. 2025 आणि 2026 या दोन्ही सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिल्या पाच सामन्यांत पराभव झाला आहे.
2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिले दोन सामने गमावले. तिसऱ्या सामन्यात Kolkata Knight Riders विरुद्ध विजय मिळवत संघाला काहीसा दिलासा मिळला. मात्र त्यानंतर पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला.
2026 मध्येही अशीच परिस्थिती आहे. यावेळी मुंबईने पहिल्याच सामन्यात KKR ला हरवत चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर सलग चार सामने गमावून पुन्हा एकदा संघ दबावाखाली आला आहे.
या दोन हंगामांत एक गोष्ट विशेष आहे ती म्हणजे KKR विरुद्ध मुंबई इंडियन्सला विजय मिळालाय, पण त्यानंतर संघाला गती मिळवता आलेली नाही. मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघासाठी अशी सुरुवात चिंताजनक मानली जाते. फलंदाजीतील अस्थिरता, गोलंदाजीत सातत्याचा अभाव आणि मिडल ऑर्डरवरील दबाव, या सर्व गोष्टींचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होताना दिसत आहे.
आता पुढील सामने मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ असणार आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहायचे असेल, तर लवकरच विजयाची लय सापडणे अत्यावश्यक आहे. नाहीतर संघ IPL मधून बाहेर जाऊ शकतो.