IPL 2026 Playoffs Schedule: IPL 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; कोणाचा सामना कुणाशी? तारीख, वेळ सगळं जाणून घ्या

IPL 2026 Playoff Schedule Announced: IPL 2026 च्या प्लेऑफमध्ये RCB, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनी स्थान मिळवले आहे.
IPL 2026 Playoffs Schedule
IPL 2026 Playoffs SchedulePudhari
Published on
Updated on

IPL 2026 Playoff Schedule Announced: IPL 2026 च्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांची नावे अखेर निश्चित झाली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB), गुजरात टायटन्स (GT), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत चौथ्या स्थानावर कब्जा केला.

आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष प्लेऑफ सामन्यांकडे लागले असून, कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचणार आणि ट्रॉफी जिंकणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया IPL 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक, सामने, मैदानं आणि वेळ.

क्वालिफायर 1: RCB विरुद्ध गुजरात टायटन्स

IPL 2026 गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये क्वालिफायर 1 रंगणार आहे. विद्यमान विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ गुजरात टायटन्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे.

हा सामना 26 मे 2026 (मंगळवार) रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

या सामन्याचा विजेता थेट IPL 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत संघाला क्वालिफायर 2 मध्ये आणखी एक संधी मिळेल.

IPL 2026 Playoffs Schedule
Yuvraj Singh: तुम्हाला चप्पलेने मारलं पाहिजे...पंजाब प्लेऑफमधून बाहेर पडताच युवराज सिंग तीन खेळाडूंवर भडकला

एलिमिनेटर: SRH विरुद्ध राजस्थान रॉयल्स

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचा स्पर्धेतील प्रवास संपणार आहे.

हा सामना 27 मे 2026 (बुधवार) रोजी मुल्लांपूर, न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. सामन्याची वेळ संध्याकाळी 7:30 वाजता आहे.

या सामन्याचा विजेता क्वालिफायर 2 मध्ये खेळेल, जिथे त्याचा सामना क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाशी होईल.

IPL 2026 Playoffs Schedule
Travis Head: विराट कोहलीसोबत वाद! ट्रेविस हेडच्या कुटुंबाला शिवीगाळ? पत्नी जेसिकाचा संताप; नेमकं काय घडलं?
IPL 2026
IPL 2026 Pudhari

क्वालिफायर 2 आणि फायनल

क्वालिफायर 2 सामना 29 मे 2026 रोजी न्यू चंदीगडमधील याच मैदानावर होणार आहे. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत पोहोचेल. तर IPL 2026 ची बहुप्रतिक्षित फायनल 31 मे 2026 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

आता प्लेऑफमध्ये कोण बाजी मारणार, RCB पुन्हा ट्रॉफी जिंकणार की SRH, GT किंवा राजस्थान रॉयल्स इतिहास रचणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news