IPL 2026 Playoff Scenario: सलग दोन पराभव; गतविजेती RCB ढेपाळली... CSK च्या मनात 'लड्डू फुटे', Playoff मध्ये 'कांड' होणार?

IPL 2026 Playoff Scenario
IPL 2026 Playoff ScenarioPUDHARI
Published on
Updated on

IPL 2026 Playoff Scenario: आयपीएल २०२६ च्या ग्रुप स्टेजचे सामने आता जवळपास संपुष्टात येत आहेत. त्यामुळं प्लेऑफमध्ये जाण्याची रेस अजूनच तीव्र झाली आहे. सध्याच्या घडीला पंजाब किंग्ज, आरसीबी आणि हैदराबाद यांनी चांगली कामगिरी करत मुसंडी मारली होती. मात्र शेवटी शेवटी त्यांच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागत आहे. त्यामुळं प्ले ऑफचं गणित अजूनच गुंतागुंतीचं होण्याची शक्यता वाढली आहे.

IPL 2026 Playoff Scenario
IPL 2026 Playoff Scenario: आता चुकला की Playoff ला मुकला... जाणून घ्या सर्व सघांची स्थिती अन् नॉक आऊटची संधी

दोन अव्वल संघांचे गणित बिघडले

कधी काळी पंजाब आणि आरसीबी गुणतालिकेत राज करत होती. मात्र आता एकद से जजबात बदलले असून गणित उलटं पालटं होत आहे. त्यात गतविजेती आरसीबी सलग दोन सामने हरल्यामुळं सर्वांसाठीच प्ले ऑफ ओपन झाला आहे.

गुरूवारी झालेल्या लखनौविरूद्धच्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचे १० सामन्यात ६ विजयासह १२ गुण झाले आहेत. जर आरसीबीला १८ गुणांपर्यंत पोहचायचं असेल तर त्यांना उरलेल्या चार सामन्यातील तीन सामने जिंकावे लागणार आहेत. पंजाब किंग्जची स्थिती देखील तशीच आहे. त्यांचे १३ गुण झाले असून त्यांना आता चार पैकी तीन साने जिंकणे गरजेचे आहे. सध्या गुणतालिकेत तळात असलेल्या मुंबई आणि लखनौने इतर संघांच्या प्लेऑफच्या मनसुब्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू केलं आहे.

IPL 2026 Playoff Scenario
IPL 2026: 7 पराभवानंतरही MI प्लेऑफमध्ये जाणार? जाणून घ्या पूर्ण समीकरण

काय आहे प्ले ऑफचं गणित?

आयपीएल २०२६ चे आतापर्यंत ५० सामने झाले आहेत. आता स्पर्धेतील फक्त २० सामने आहेत. ताज्या गुणतालिकेनुसार सनराईजर्स हैदराबाद अव्वल स्थानावर आहे. प्ले ऑफचे ताजे समीकरण पाहता १८ गुण मिळवणारे संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील असं दिसत आहे. आता हैदराबादचे १४ गुण झाले आहेत. त्यांना तीन पैकी २ सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.

पंजाब आणि आरसीबी देखील प्ले ऑफचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी देखील तर चार पैकी तीन सामने जिंकले तर ते सहज प्ले ऑफ गाठतील. पंजाबचा एक सामना वॉश आऊट झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त एक गुण मिळाला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत टॉप करण्याची शक्यता आहे. तर पंजाब आणि आरसीबी १७ मे रोजी एकमेकांना भिडणार आहे. हा सामना रोमांचक ठरणार आहे.

IPL 2026 Playoff Scenario
Hardik Pandya | "हार्दिकला कुणाचाच सपोर्ट नाही"; मुंबईच्या ड्रेसिंग रूमबद्दल माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

राजस्थान आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघ समान पातळीवर आहेत. त्यांचे प्रत्येकी १२ गुण झाले आहेत. त्यांना १८ गुण मिळवण्यासाठी चारपौकी तीन सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि लखनौ दोन्ही संघ प्रत्येकी १६ गुणांपर्यंत पोहचू शकतात. मात्र त्यांनी आता दुसऱ्या संघांचे गणित बिघडवणे सुरू केले आहे. त्यामुळं प्ले ऑफची रेस तीव्र झाली आहे.

IPL 2026 Playoff Scenario
Ayush Mhatre: CSK ला मोठा धक्का! दुखापतीमुळे आयुष म्हात्रे IPL मधून बाहेर; आत 'या' खेळाडूची एन्ट्री होणार

चेन्नई सुपर किंग्जलाही संधी

चेन्नई सुपर किंग्ज देखील अजून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्यांचे अजून ४ सामने बाकी असून त्यांचे १० गुण झाले आहेत. जर चेन्नई सुपर किंग्जने चारही सामने जिंकले तर ते प्ले ऑफसाठी आपली प्रबळ दावेदारी सादर करू शकतात. कोलकाता नाईट रायडर्सचे पाच सामने शिल्लक आहेत. पावसामुळे त्यांना एक गुण अतिरिक्त मिळाला आहे. जर केकेआरने पाचही सामने जिंकले तर ती प्ले ऑफ मध्ये जाणारी चौथी टीम ठरू शकते. जर पाच सामने जिंकले तर त्यांचे १६ गुण होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news