IPL 2026 Final: आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला; बंगळूरला मोठा धक्का...BCCIने का घेतला यू-टर्न?

IPL 2026 Final: BCCI ने IPL 2026 फायनल अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतला. तिकीट विक्रीतील वादामुळे बेंगळुरूचे होम ग्राऊंड फायनलसाठी नाकारण्यात आले.
IPL 2026 Final
IPL 2026 FinalPudhari
Published on
Updated on

IPL 2026 Final: IPL 2026 च्या प्लेऑफ आणि फायनलच्या ठिकाणांबाबत मोठा बदल करण्यात आला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. BCCI ने अंतिम सामना अहमदाबादमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वीच्या नियमानुसार, आयपीएलचा फायनल सामना हा विद्यमान विजेत्या संघाच्या होम ग्राऊंडवर खेळवला जातो. त्यामुळे यंदा बेंगळुरू या स्पर्धेत आघाडीवर होते. मात्र, अलीकडेच झालेल्या तिकीट विक्री आणि व्यवस्थापनातील वादामुळे संपूर्ण चित्र बदलले आणि BCCI ला आपला निर्णय बदलावा लागला.

आता IPL 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे 31 मे रोजी खेळवला जाणार आहे. याआधीही या मैदानावर अनेक मोठे सामने रंगले असून पुन्हा एकदा फायनलची जबाबदारी या स्टेडियमवर सोपवण्यात आली आहे.

प्लेऑफचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. 26 मे रोजी क्वालिफायर-1 सामना HPCA स्टेडियम येथे होणार आहे. त्यानंतर 27 मे रोजी एलिमिनेटर आणि 29 मे रोजी क्वालिफायर-2 हे सामने न्यू चंदीगडमध्ये खेळवले जातील.

IPL 2026 Final
Sunil Gavaskar | 'शतकासाठी स्वार्थी व्हावे लागले असते'; संजू सॅमसनच्या रिॲक्‍शनवर सुनील गावस्‍कर म्‍हणाले, "संयम नेहमीच.."

अहमदाबादसाठी ही आणखी एक मोठी संधी मानली जात आहे. गेल्या काही हंगामात या शहराने IPL फायनलचे यजमानपद अनेकदा भूषवले आहे. 2022 आणि 2023 मध्येही येथेच अंतिम सामने झाले होते. 2024 मध्ये मात्र चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर फायनल सामना झाला होता, जिथे कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.

IPL 2026 Final
IPL 2026: 7 पराभवानंतरही MI प्लेऑफमध्ये जाणार? जाणून घ्या पूर्ण समीकरण

एकूणच, बेंगळुरूच्या हातातून फायनलची संधी निसटली असली तरी अहमदाबाद पुन्हा एकदा IPL च्या सर्वात मोठ्या सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. तिकीट वादामुळे घेतलेला हा निर्णय आगामी काळात IPL आयोजनाच्या पद्धतीवरही प्रभाव टाकू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news