IPL 2026 : ओपनिंग मॅचपूर्वीच कोहलीच्या ‘RCB’ला मोठा झटका! मलिंगा शैलीतील गोलंदाज 'अनफिट', खेळण्यावर टांगती तलवार

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
IPL 2026 : ओपनिंग मॅचपूर्वीच कोहलीच्या ‘RCB’ला मोठा झटका! मलिंगा शैलीतील गोलंदाज 'अनफिट', खेळण्यावर टांगती तलवार
Published on
Updated on

बेंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) १९ व्या हंगामाचा बिगुल वाजण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आरसीबीची वेगवान गोलंदाजीची फळी आधीच कमकुवत वाटत असताना, आता श्रीलंकेचा आक्रमक गोलंदाज नुवान तुषारा याच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा सारखी गोलंदाजीची शैली लाभलेला तुषारा फिटनेस टेस्टमध्ये (शारीरिक क्षमता चाचणी) अपयशी ठरल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी अद्याप परवानगी नाकारली आहे.

IPL 2026 : ओपनिंग मॅचपूर्वीच कोहलीच्या ‘RCB’ला मोठा झटका! मलिंगा शैलीतील गोलंदाज 'अनफिट', खेळण्यावर टांगती तलवार
Cricket History : जेव्हा सिद्धूंच्या दुखापतीने बदलले भारतीय क्रिकेटचे नशीब; वाचा, सचिन कसा बनला 'वर्ल्ड क्लास' ओपनर!(VIDEO)

फिटनेस टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

'ईएसपीएन क्रिकइन्फो'ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे (SLC) मुख्य कार्यकारी अधिकारी ॲश्ले डी सिल्वा यांनी शुक्रवारी या संदर्भात अधिकृत माहिती दिली. तुषारा याने फिटनेस टेस्टसाठी निश्चित केलेल्या पाच विविध निकषांवर २९ पैकी १७ गुणांचा अनिवार्य टप्पा गाठणे आवश्यक होते, परंतु तो यामध्ये अपयशी ठरला. या तांत्रिक अडचणीमुळे तुषारा किमान आरसीबीच्या पहिल्या सामन्याला मुकणार हे आता स्पष्ट झाले आहे. शनिवारी २८ मार्च रोजी बेंगळुरूच्या घरच्या मैदानावर आरसीबीची गाठ सनरायझर्स हैदराबादशी पडणार आहे.

आरसीबीच्या अडचणींत भर

आरसीबीसाठी चिंतेची बाब केवळ तुषारापुरती मर्यादित नाही. यापूर्वीच यश दयाल स्पर्धेतून बाहेर पडला असून, अनुभवी जोश हेझलवूडच्या सहभागाबाबतही अद्याप साशंकता कायम आहे. अशा परिस्थितीत तुषारा उपलब्ध न होणे हा संघासाठी मोठा तडाखा मानला जात आहे. नियमानुसार, तुषाराला आता ४ ते ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. जर तो दुसऱ्या वेळीही अपयशी ठरला, तर त्याला संपूर्ण हंगामासाठी मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, ५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यातही तो खेळण्याची शक्यता धूसर आहे.

IPL 2026 : ओपनिंग मॅचपूर्वीच कोहलीच्या ‘RCB’ला मोठा झटका! मलिंगा शैलीतील गोलंदाज 'अनफिट', खेळण्यावर टांगती तलवार
IPL 2026 RCB : चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा कायमस्वरूपी राहणार रिक्त; RCB चा ऐतिहासिक आणि भावूक निर्णय

पथिराना आणि हसरंगा यांचीही प्रतीक्षा

केवळ आरसीबीच नव्हे, तर इतर संघांनाही श्रीलंकेच्या खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसताना दिसत आहे. मथीशा पथिराना आणि वानिंदू हसरंगा हे खेळाडूदेखील सध्या दुखापतींशी झुंज देत आहेत. लखनौ सुपर जायंट्सने २ कोटींना खरेदी केलेला हसरंगा आणि कोलकाता नाईट रायडर्सने १८ कोटींची मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलेला पथिराना, या दोघांनीही अद्याप त्यांची फिटनेस टेस्ट दिलेली नाही. त्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या या स्टार खेळाडूंची उणीव प्रकर्षाने भासणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news