IPL 2025 Points Table : सीएसकेच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला धक्का, प्लेऑफमध्ये पोहोचण्याची लढाई बनली रोमांचक

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सीएसकेचा पराभव केल्यानंतर 16 गुण मिळवले. यासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले.
ipl 2025 points table mumbai indians
Published on
Updated on

ipl 2025 points table mumbai indians playoffs scenario

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 3 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळलेला सामना 2 धावांनी जिंकून पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 213 धावा केल्या तर सीएसकेला 211 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह, आरसीबीने प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे, परंतु आता लीग स्टेज सामने संपल्यानंतर त्यांचे लक्ष टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यावर आहे.

आरसीबीच्या विजयाने आणि सीएसकेच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे. एमआय संघ यापूर्वी नंबर-1 वर होता पण आता ते दुसऱ्या स्थानावर आले आहेत.

ipl 2025 points table mumbai indians
IPL 2025 Points Table : 16 गुणांनंतरही आरसीबी ‘प्लेऑफ’च्या तिकीटापासून वंचित, जाणून घ्या समीकरण

IPL 2025 : पॉइंट टेबलमध्ये 2 संघांचे 14-14 गुण

जर आपण आयपीएल 2025 च्या 52 सामन्यांनंतरच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, 11 सामन्यांमध्ये 8 विजयांसह आरसीबी 16 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर मुंबई इंडियन्स 11 सामन्यांमध्ये 7 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, गुजरात टायटन्सचेही 14 गुण आहेत पण त्यांनी आतापर्यंत फक्त 10 सामने खेळले आहेत.

ipl 2025 points table mumbai indians
RCB vs CSK : चेन्नईला हरवून आरसीबी ‘टॉप’वर

पंजाब किंग्ज 10 सामन्यांतून 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, कोणता संघ टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आरसीबी निश्चितच थोडे पुढे असल्याचे दिसते. दिल्ली कॅपिटल्स देखील प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत, 10 सामन्यांतून 12 गुणांसह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत.

ipl 2025 points table mumbai indians
Virat Kohli like Avneet Kaur Photo : अवनीत कौरच्या फोटोला लाईक करणे विराटला पडले महागात! ट्रोल होताच नेटक-यांना द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2025 : LSG, KKR साठी प्लेऑफचा मार्ग कठीण

लखनौ सुपर जायंट्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे थोडे कठीण दिसते. लखनौ संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकण्यात यश आले आहे आणि 5 सामने गमावले आहेत. यानंतर, केकेआरचा संघ 10 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला आहे, ज्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण वाटत आहे.

ipl 2025 points table mumbai indians
अनुष्काच्या बर्थडेला कोहलीने इन्स्टाग्रामवर ‘Like’ केलेली अवनीत कौर आहे कोण?

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने 10 सामन्यांपैकी 3 सामने जिंकूनही काही समीकरणांमुळे प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news