IPL 2025 Points Table : 16 गुणांनंतरही आरसीबी ‘प्लेऑफ’च्या तिकीटापासून वंचित, जाणून घ्या समीकरण

RCBने CSK विरुद्धचा सामना 2 धावांनी जिंकला आणि 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले.
IPL 2025 Virat Kohli RCB Team playoffs scenario
Published on
Updated on

rcb vs csk match rcb team ipl 2025 playoffs scenario after 16 points

बेंगळुरू : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या एका रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच बेंगळुरूने एका हंगामातील दोन्ही लीग स्टेज सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव केला आहे. या हंगामात बेंगळुरूचा हा आठवा विजय आहे. या विजयासह आरसीबीच्या खात्यात 16 गुण जमा झाले आहेत. प्लेऑफसाठी त्यांनी आपले स्थान मजबूत ठेवले असले तरी, 16 गुणांसह त्यांना अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्रता मिळालेली नाही. दुसरीकडे, आधीच बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जला हंगामातील 9 वा पराभव पत्करावा लागला आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी राहिले आहेत.

या विजयासह आरसीबी 16 गुणांचा जादुई आकडा गाठणारा पहिला संघ बनला आहे. प्लेऑफसाठी त्यांनी आपले स्थान मजबूत केले आहे. हा गुणांचा आकडा बहुतेक वेळा संघांना प्लेऑफचे तिकीट मिळवून देतो. पण आरसीबीला 16 गुणांसह अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्रता अद्याप मिळालेली नाही. जाणून घेऊया यामागील कारण आणि उर्वरित संघांचे प्लेऑफ समीकरण..

IPL 2025 Virat Kohli RCB Team playoffs scenario
अनुष्काच्या बर्थडेला कोहलीने इन्स्टाग्रामवर ‘Like’ केलेली अवनीत कौर आहे कोण?

यंदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चुरशी लढत पहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 11 सामन्यांत 8 विजय आणि 3 पराभवांसह 16 गुण झाले आहेत. बंगळुरूचा नेट रन रेट +0.482 आहे. पण त्यांच्या नावासमोर प्लेऑफसाठी पात्रता हा टॅग लागलेला नाही.

IPL 2025 Virat Kohli RCB Team playoffs scenario
Virat Kohli like Avneet Kaur Photo : अवनीत कौरच्या फोटोला लाईक करणे विराटला पडले महागात! ट्रोल होताच नेटक-यांना द्यावे लागले स्पष्टीकरण

आरसीबीचे उर्वरित तीन सामने

आरसीबीचे उर्वरित तीन सामने आता लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहेत. जर संघाने यापैकी एकही सामना जिंकला तर हा संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल. त्यांच्याशिवाय, लीग टप्प्यात असे 6 संघ आहेत जे 16 किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकतात. यामुळे, आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

IPL 2025 Virat Kohli RCB Team playoffs scenario
Vaibhav Suryavanshi Age Controversy : वैभव सूर्यवंशी 14 चा नसून 16 वर्षांचा? IPL स्टारच्या वयावरून गदारोळ!

असे आहे पॉइंट्स टेबल

सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स 14 गुणांसह दुसऱ्या, गुजरात 14 गुणांसह तिसऱ्या, पंजाब 13 गुणांसह चौथ्या, दिल्ली 12 गुणांसह पाचव्या आणि लखनौ 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर कोलकाता सातव्या स्थानावर आहे. त्यानंतर राजस्थान आठव्या, हैदराबाद नवव्या स्थानावर आणि चेन्नई 4 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. हे तीनही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news