Virat Kohli IPL Records : कोहलीने चोपल्या सर्वाधिक वेळा 500 हून अधिक धावा, बनला जगातील पहिला खेळाडू

Kohli Broke Warner's Record : विराट कोहली हा आयपीएलच्या बहुतेक हंगामात 500 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
Virat Kohli IPL Records
Published on
Updated on

बेंगळुरू : आयपीएलच्या 18 व्या हंगामात विराट कोहलीची बॅट चांगली तळपत आहे. स्पर्धेचा 52 वा सामना शनिवारी (दि. 3) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. येथे डावाची सुरुवात करताना कोहलीने 33 चेंडूत 62 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. यासह त्याने आयपीएलच्या चालू हंगामात 500 धावांचा टप्पा पार केला. आतापर्यंतच्या हंगामात त्याने 11 सामने खेळले असून यादरम्यान त्याच्या बॅटमधून 63.13 च्या सरासरीने 505 धावा झळकल्या आहेत.

कोहलीने मोडला वॉर्नरचा विक्रम

चालू हंगामात 500 धावांचा आकडा गाठून कोहलीने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा 500+ धावा करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी तो ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. पण आता कोहली त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेला आहे.

Virat Kohli IPL Records
IPL Records : एकाच संघाला सर्वाधिक वेळा 50+ धावांचा तडाखा देणारे धमाकेदार फलंदाज

IPL हंगामात 500+ धावा करणारे खेळाडू

  • 8 वेळा : विराट कोहली (भारत)

  • 7 वेळा : डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

  • 6 वेळा : केएल राहुल (भारत)

  • 5 वेळा : शिखर धवन (भारत)

Virat Kohli IPL Records
Who is Ayush Mhatre : विक्रमवीर आयुष म्हात्रे कोण आहे? आजोबांनी असं काही केलं, आता जग ठोकतंय सलाम

कोहलीचे 62वे IPL अर्धशतक

सीएसकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 62 वे अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने डावाची सुरुवात करताना एकूण 33 चेंडूंचा सामना करत 187.88 च्या स्ट्राईक रेटने 62 वसूल केल्या. दरम्यान, क्रिकेटप्रेमींना त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि पाच उत्कृष्ट षटकार पाहायला मिळाले.

Virat Kohli IPL Records
IPL इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा

कोहली आता आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. सीएसकेविरुद्ध त्याच्या एकूण 1146 धावा झाल्या आहेत. याबाबतीतही त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 1134 धावा केल्या आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1130 धावांसह कोहली तिसऱ्या स्थानावरही आहे.

CSK विरुद्ध 10 व्यांदा 50+ धावांची इनिंग

कोहलीने सीएसकेविरुद्ध 10 व्यांदा 50+ धावांची इनिंग खेळली. आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या यादीत त्याने शिखर धवन, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकले. या तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी नऊ वेळा अशी कामगिरी केली आहे.

Virat Kohli IPL Records
IPL 2025 Points Table : 16 गुणांनंतरही आरसीबी ‘प्लेऑफ’च्या तिकीटापासून वंचित, जाणून घ्या समीकरण

CSK विरुद्ध RCBची दुसरी सर्वोच्च सलामी

विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. चेन्नईविरुद्ध आरसीबीची ही दुसरी सर्वोच्च सलामी ठरली. 2021 मध्ये कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी शारजाह येथे 111 धावांची सलामी दिली होती.

चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक टी-20 षटकार

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने पाच षटकार ठोकले. यासह, तो टी-20 क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याचे आतापर्यंत 154 टी-20 षटकार झाले आहेत. याबाबतीत त्याने ख्रिस गेलला मागे टाकले. गेलने चिन्नास्वामी स्टेडियमवर 151 षटकार खेचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news