Shubman Gill : कॅप्टन गिलचा डंका! अभिषेक शर्माला पछाडत पटकावला ICC चा मोठा पुरस्कार

ICC Players of the Month : पाचव्यांदा आयसीसी पुरस्कार पटकावणारा ठरला पहिलाच भारतीय
Shubman Gill ICC Players of the Month
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलने आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर क्रिकेट जगतात नवा इतिहास रचला आहे. सप्टेंबर महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या पुरस्कारावर गिलने आपले नाव कोरले आहे.

या पुरस्काराच्या शर्यतीत गिलने स्वतःचा सहकारी खेळाडू अभिषेक शर्मा आणि झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू सिकंदर रझा यांना मागे टाकले. या दोघांनाही आयसीसीने या पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. विशेष म्हणजे, कारकिर्दीत पाचव्यांदा हा किताब पटकावणारा गिल हा भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत गिलने तुफानी फलंदाजी करत हा पराक्रम गाजवला.

Shubman Gill ICC Players of the Month
Vaibhav Sooryavanshi Controversy: टीम इंडियात हुकूमशाही... वैभव सूर्यवंशीच्या कोचचे संघ व्यवस्थापनावर 'गंभीर' आरोप

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली गेली. या मालिकेतील पहिले दोन सामने सप्टेंबर महिन्यात रंगले होते आणि याच सामन्यांमध्ये गिलने वादळी खेळीचे प्रदर्शन केले. केवळ पहिल्या दोन सामन्यांतच गिलने तब्बल ३३३ धावांचा डोंगर रचला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ११० धावांची दमदार खेळी केली, तर दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद २२३ धावा ठोकत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात तो एका धावेवर बाद झाला असला, तरी भारताने पहिले दोन्ही सामने आठ गडी राखून जिंकत मालिका आधीच आपल्या नावावर केली होती.

Shubman Gill ICC Players of the Month
Samson Vs Vaibhav : वैभव सूर्यवंशीला बाहेर बसविण्‍यासाठीच संजूची 'खेळी' : आर. अश्विनचं मोठं विधान

या मालिकेत गिलने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा नवा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला. त्याने अवघ्या १३३ चेंडूंत २६ चौकार आणि ८ गगनभेदी षटकारांच्या मदतीने नाबाद २२३ धावा कुटल्या. या खेळीदरम्यान गिलने अवघ्या ६२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले होते, जे कोणत्याही भारतीय कर्णधाराने केलेले सर्वात जलद शतक ठरले. त्यानंतर त्याने केवळ ११७ चेंडूंत आपले द्विशतक साकारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम आपल्या नावे नोंदवला. याद्वारे गिलने आपलाच सहकारी खेळाडू इशान किशनचा विक्रम मोडीत काढला.

शुभमन गिलच्या कारकिर्दीतील 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा हा पाचवा बहुमान आहे. यापूर्वी त्याने सर्वप्रथम जानेवारी २०२३ मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये तो पुन्हा या सन्मानाचा मानकरी ठरला. पुढे २०२५ मध्ये फेब्रुवारी आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांत त्याने हा पुरस्कार जिंकला होता. आता पाचव्यांदा या किताबावर नाव कोरून त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गिलच्या आधी मार्च २०२६ मध्ये भारताच्या संजू सॅमसनने हा पुरस्कार आपल्या नावे केला होता.

Shubman Gill ICC Players of the Month
Pakistan Cricket : पाकिस्तानातील राजकीय 'खेळा'त क्रिकेट 'क्लीन बोल्ड'; 'पीसीबी'वर नेमकी कोणती नामुष्की ओढवली?

दरम्यान, पुरुष गटासोबतच महिलांच्या विभागातही भारतानेच बाजी मारली आहे. भारतीय महिला संघाची धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्माची सप्टेंबर २०२६ महिन्यासाठी 'आयसीसी विमेन्स प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून निवड झाली आहे. २२ वर्षीय शेफालीने हा सन्मान जिंकण्याची ही दुसरी वेळ असून, तिने सर्वप्रथम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news