Vaibhav Sooryavanshi Controversy: टीम इंडियात हुकूमशाही... वैभव सूर्यवंशीच्या कोचचे संघ व्यवस्थापनावर 'गंभीर' आरोप

वैभव सूर्यवंशीचे लहाणपणीचे कोच मनीष ओझा यांनी मोठा आरोप केला आहे.
Vaibhav Sooryavanshi Controversy
Vaibhav Sooryavanshi Controversypudhari
Published on: 
Updated on: 

Vaibhav Sooryavanshi Controversy: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत ८ टी २० सामने खेळले असून इंग्लंडसोबतच तो झिम्बाब्वे आणि जपानविरूद्ध भारतीय संघाकडून खेळला आहे. मात्र त्यानंतर वैभवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

सूर्यवंशी अफगाणिस्तानविरूद्धच्या टी २० मालिकेत बेंचवरच होता. त्यानंतर वेस्ट इंडीजविरूद्धच्या सुरू असलेल्या टी २० मालिकेत देखील पहिल्या तीन सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. यानंतर आता वैभव सूर्यवंशीचे लहाणपणीचे कोच मनीष ओझा यांनी मोठा आरोप केला आहे. गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन वैभवबाबत हुकूमशाही पद्धतीनं वागत आहे.

Vaibhav Sooryavanshi Controversy
Samson vs Vaibhav Sooryavanshi : ‘वैभव सूर्यवंशीला वगळा, सॅमसनला संधी द्या’; भारत-अफगाणिस्तान मालिकेपूर्वी रहाणेचे मोठे विधान

काय म्हणाले वैभवचे प्रशिक्षक?

मनीष ओझाने स्पोर्ट्स नाऊशी बोलताना सांगितलं की, 'मला वाटते की आता मॅनेजमेंट एक प्रकारे हुकूमशाही पद्धतीनं वागत आहे. ज्याच्या मनात जे आलं ते तो करत आहे. आताच्या संघ व्यवस्थापनाला खेळाडूंना बेंचवर बसवून तयार करता येतं असं वाटतं. बेंचवर बसून कोणता खेळाडू तयार झाला आहे ना तयार होणार.'

Vaibhav Sooryavanshi Controversy
Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षाच्या वैभवमुळे माझी पत्नी... भारताच्या माजी क्रिकेटपटूने सूर्यवंशीचे केले तोंडभरून कौतुक

ओझा पुढे म्हणाले, 'या लोकांनी एकतर ठरवलं आहे की या मुलाला संधी द्यायची नाही. त्याला बाहेर बसवून फ्रस्ट्रेट करायचं. तो (वैभव सूर्यवंशी) बाहेर बसून सतत पाणी पाजत आहे.'

संजू सॅमसनशी स्पर्धा

डावखुरा फलंदाज सूर्यवंशी भारतीय संघाच्या ओपनिंग स्लॉटसाठी वाट पाहत आहे. त्याची स्पर्धा ही स्टार खेळाडू संजू सॅमसनसोबत आहे. गंभीर आणि संघ व्यवस्थापन सध्याच्या घडीला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडवर जास्त विश्वास दाखवत आहे. संजू सॅमसनने भारताला २०२६ चा टी २० वर्ल्डकप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तो मालिकावीर देखील होता.

Vaibhav Sooryavanshi Controversy
Vaibhav Sooryavanshi U19 Selection: वरिष्ठ संघात खेळतोय तरी वैभव सूर्यवंशीची १९ वर्षाखालील संघात का झाली नाही निवड?

गंभीरने घेतला कटू निर्णय

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरूद्ध पदार्पण केल्यानंतर सॅमसनला प्लेईंग ११ मधून बाहेर ठेवण्याचा कटू निर्णय घेतला होता. गंभीरने हा आपल्या कोचिंग कार्यकाळातील सर्वात कठीण निर्णय असल्याचं सांगितलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news