Asian Games 2026: भारताच्या लेकींचा 'अचूक निशाणा' अन् चीनचा पराभव! तिरंदाजीत पटकावले सुवर्णपदक

India women compound archery gold medal: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने शानदार कामगिरी करत देशाला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले
Asian Games 2026 India women compound archery
women compound archery teamFile Photo
Published on: 
Updated on: 

Asian Games 2026 India women compound archery gold medal

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने आपले सातवे सुवर्णपदक जिंकले; महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत चीनचा २३८-२३४ असा पराभव करून मागील स्पर्धेतील आपले विजेतेपद कायम राखले. या विजयासह भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण ५३ पदके जमा झाली आहेत.

भारताच्या महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने हांगझोऊ येथे २०२३ मध्ये मिळवलेले सुवर्णपदक यंदाही कायम राखले. या विजयासह भारताने या स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले असून, २०१४ मध्ये दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या जागतिक आणि आशियाई विक्रमाचीही बरोबरी केली.

Asian Games 2026 India women compound archery
Asian Games 2026: गोल्डन गर्ल्स! इराणचा पराभव करत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले सुवर्णपदक

ज्योती, प्रतीका आणि चिखिता या त्रिकुटाने अंतिम फेरीत अचूक निशाणा साधत भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. सामन्यात भारतीय खेळाडूंनी सातत्याने अचूक बाण सोडत प्रतिस्पर्धी चीनच्या संघावर आघाडी कायम ठेवली. तिन्ही खेळाडूंमध्ये उत्कृष्ट समन्वय पाहायला मिळाला. त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे भारतीय तिरंदाजी संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे.

२०१४ पासून प्रत्येक स्पर्धेत पदक

महिला कंपाउंड तिरंदाजी संघाचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांचा सिलसिला कायम आहे. २०१४ मध्ये या प्रकाराचा समावेश झाल्यापासून भारताने प्रत्येक आवृत्तीत पदक पटकावले आहे. २०१४ मध्ये कांस्य, तर २०१८ मध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर भारताने सलग दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. ३० वर्षीय ज्योती सुरेखा वेन्नम या चारही पदकविजेत्या भारतीय संघांचा भाग राहिल्या आहेत.

या सुवर्णपदकामुळे भारताने एकूण पदकतालिकेत नववे स्थान गाठले आहे. मंगळवारी महिला ४x४०० मीटर रिले संघाने अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले होते.

उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाविरुद्ध रंगली चुरस

अंतिम फेरीपूर्वी भारताला उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. भारताने ही लढत २३४-२३३ अशी केवळ एका गुणाने जिंकली. सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात दक्षिण कोरियाने जोरदार पुनरागमन करत गुणसंख्या १७५-१७५ अशी बरोबरीत आणली होती. यानंतर भारतीय संघाने एका गुणाची आघाडी घेतली. चिकिता आणि पृथिकाने प्रत्येकी १० गुणांचा अचूक निशाणा साधला, तर ज्योतीने नऊ गुण मिळवत भारताचा विजय निश्चित केला.

Asian Games 2026 India women compound archery
Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा ‘ट्रिपल धमाका’! साधली पदकांची हॅटट्रिक, एकाच ‘आशियाई’ स्पर्धेत ३ वैयक्तिक पदकांवर मोहोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news