IND vs PAK Asia Cup : ५ फलंदाज, ३ अष्टपैलू, ३ गोलंदाज… पाकिस्तानविरुद्ध ‘असा’ असणार भारताचा संभाव्य संघ

भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. अंतिम ११ खेळाडूंच्या संघावर शिक्कामोर्तब कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्यापूर्वी मोठे संकेत मिळाले आहेत.
India vs Pakistan Asia Cup match September 14
Published on
Updated on

India vs Pakistan Asia Cup match September 14

संयुक्‍त अरब अमिराती (UAE) विरुद्ध भारतीय संघाचा दणदणीत विजय पाहिल्यानंतर आता पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्याची प्रतीक्षा आहे. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या महासंग्रामासाठी भारतीय संघाच्या संभाव्य अंतिम ११ खेळाडूंबद्दल मोठे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे संघात कोणते खेळाडू असतील याचा अंदाज येतो. या हायव्होलटेज सामन्यासाठी भारतीय संघाची रचन ५ फलंदाज, ३ अष्टपैलू खेळाडू आणि ३ गोलंदाज अशी असण्याची शक्यता आहे.

India vs Pakistan Asia Cup match September 14
Ind-Pak cricket match: भारत- पाकिस्तान सामना होऊ द्या; सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी घेण्यास दिला नकार

आता प्रश्न असा आहे की पाकिस्तानविरुद्धच्या भारतीय संघात कोणते चेहरे असतील? तर, याचे उत्तर माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्या बोलण्यातून मिळते. त्यांच्या मते, UAE विरुद्ध जो संघ खेळला होता, तोच संघ पाकिस्तानविरुद्धही खेळताना दिसेल. म्हणजेच, संघात कोणताही बदल होणार नाही. अजय जडेजा यांनी हे विधान UAE विरुद्ध भारताचा सामना सुरू होण्यापूर्वी आशिया कपच्या प्रक्षेपण वाहिनी 'सोनी नेटवर्क'च्या माध्यमातून केले होते.

India vs Pakistan Asia Cup match September 14
Kuldeep dropped vs Pakistan : पाकविरुद्धच्या सामन्यातून कुलदीप यादवला ‘डच्चू’ मिळणार? गंभीर गुरुजींवर माजी क्रिकेटपटूचा निशाणा

UAE विरुद्ध भारताच्या अंतिम ११ खेळाडूंवर चर्चा करताना अजय जडेजा म्हणाले होते की, भारताने UAE विरुद्ध ८ फलंदाजांना खेळवू नये होते. पण जर तसे केले असेल, तर पाकिस्तानविरुद्ध जो संघ खेळणार आहे, तो तुम्ही आजच पाहिला आहे. म्हणजेच, UAE विरुद्ध खेळलेला संघच पाकिस्तानविरुद्धही खेळणार आहे.

India vs Pakistan Asia Cup match September 14
Kuldeep Yadav Record : कुलदीप यादव विदेशी भूमीवरचा ‘गेम चेंजर’! आर. अश्विनचा ‘हा’ विक्रम काढला मोडीत

भारताची संभाव्य अंतिम ११ खेळाडूंची यादी

जर UAE विरुद्धचाच भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार असेल चित्र स्पष्ट आहे. हा संघ खालील प्रमाणे असेल....

फलंदाज : शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक)

अष्टपैलू खेळाडू : हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल

गोलंदाज : कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news