India Lost To Ireland: वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये घेऊन प्रश्न सुटणार नाही... या ६ गोष्टी देखील टीम इंडियासाठी आहेत डोकेदुखी

India Lost To Ireland
India Lost To Irelandpudhari
Published on
Updated on

India Lost To Ireland:आयर्लंडविरूद्धच्या दोन टी २० सामन्यांच्या मालिकेत यजमान आयर्लंडने भारताला २-० असा व्हाईट वॉश दिली होता. या नामुष्कीजनक पराभवानंतर संघात १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला संधी का दिली नाही. त्यामुळं भारताची फलंदाजी कमकुवत झाली अन् त्याचा फटका आपल्याला दोन्ही सामन्यात बदल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र आयर्लंडविरूद्धच्या मालिका पराभवाला फक्त वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये न खेळवणं हे एकमेव कारण नाही तर अनेक फॅक्टर याला जबाबदार आहेत. प्रामुख्यानं भारताच्या मालिका पराभवासाठी ६ फॅक्टर कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

India Lost To Ireland
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलचा 'पाटा' नाहिसा होताच वैभवच्या बॅटला लागलं ग्रहण; दमदार सुरूवातीनंतर फटके 'क्लिअर' का होत नाहीयेत?

१ टीम कॉम्बिनेश सेट नाही

ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारताची प्लेईंग ११ कशी असेल याबद्दल खूप खल झाला होता. कोणाला संधी मिळणार कोणाला बाहेर बसावं लागणार याबात चर्चा झाली. सूर्यकुमार यादवला हटवण्याची भूमिका योग्य होती का. वैभव सूर्यवंशीला खेळायची संधी मिळणार का याबाबत चर्चा सुरू होती.

जर संघच आपली बेस्ट प्लेईंग ११ ठरवू शकत नसेल तर मैदानावर याचे परिणाम दिसतातच. सतत संघात बदल करणे भविष्यासाठी योग्य असेल मात्र याचा फटका सिरीजमध्ये बसू शकतो.

India Lost To Ireland
Vaibhav Suryavanshi: भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वीच वैभव सूर्यवंशीला इशारा; सौरव गांगुली काय म्हणाला हे वाचून बसेल धक्का

२ सुरूवात खराब

टी२० क्रिकेटमध्ये पहिली सहा षटके सामन्याची दिशा ठरवत असतात. मात्र भारताची दोन्ही सामन्यात अत्यंत खराब सुरूवात झाली. यामुळं मधल्या फळीवर प्रचंड दबाव आला. त्यामुळं आक्रमक खेळण्याऐवजी विकेट वाचवण्याचा प्रयत्न मधल्या फळीवर आली. सध्याच्या टी २० क्रिकेटमध्ये बचावात्मक फॉर्म्युला क्वचितच वेळी चालतो.

३ बुमराहला पर्याय कोण?

भारतीय टीम बुमराहचा वर्कलोड मॅनेजमेंट करत आहे. मात्र हे करत असताना त्याच्या तोडीचा पर्याय असून भारतीय संघाकडे नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत त्याची जबाबदारी कोण उचलणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. संघ व्यवस्थापनाने मोहम्मद सिराजला टी २० सेटअपमधून जवळपास बाहेरच काढलं आहे.

आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत भारताकडे विकेट घेणार गोलंदाज, डेथ ओव्हरमध्ये धावा रोखणारा गोलंदाज नसल्याचं दिसून आलं. भारताला आता बुमराहवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याचा पर्याय शोधण्याची गरज आहे.

India Lost To Ireland
Vaibhav Suryavanshi |पाकिस्‍तानमध्‍येही वैभव सूर्यवंशीचा 'दरारा'; क्रिकेट विश्लेषक थेट म्हणाला, "खुदा न खास्ता..."

४ फ्लॅट खेळपट्ट्यांचे बादशाह?

भारतीय फलंदाज हे फक्त पाटा खेळपट्टीवर आपल्या बेडक्या फुगवतात. मधली फळी भारताची ताकद आहे. मात्र थोड्या आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर ही ताकद शेपूट घातले असं दितसं. जिथं चेंडू स्विंग आणि सीम होतो तिथं ही तगडी मधल्या फळीतील फलंदाजी सामान्य वाटते. हा पॅटर्न वर्ल्डकपमध्ये देखील दिसलं होतं.

५ आयपीएलचा स्ट्राईक रेट आंतरराष्ट्रीय स्तरावर फेल

आयपीएल जगातील सर्वात मोठी टी २० लीग आहे. मात्र आयपीएल स्टार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच धाटणीत यशस्वी होतील याची काही शाश्वती नसते. पाटा खेळपट्टीवर चेंडू थांबून येऊ लागला की हे स्ट्राईक रेट गाठणे अवघड होऊन जाते.

या खेळपट्टीच्या दृष्टीकोणातून अॅडजेस्टमेंट करणं अजूनही भारतीय फलंदाजांना जमत नाहीये. नेहमी मोठे फटके मारणे गरजेचे नसते. परिस्थिती पाहून फटक्यांची निवड करणे गरजेचे असते.

India Lost To Ireland
Vaibhav Sooryavanshi Manager: या मॅनेजर्सपासून सावध रहा... माजी भारतीय खेळाडूने दिला वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला

६ स्पेशलिस्ट स्पिनर कुठं आहे?

भारतीय संघात फिरकी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे मात्र स्पेशलिस्ट स्पिनर कोण आहे हा प्रश्नच आहे. हा स्पेशलिस्ट स्पिनर सामन्यामध्ये मधल्या षटकात सामन्याचं चित्र पालटण्याची ताकद ठेवतो. ज्यावेळी वेगवान गोलंदाज फेल जातात त्यावेळी हा स्पेशलिस्ट स्पिनर डाव सावरू शकतात. मात्र सध्याच्या घडीला असा स्पेशलिस्ट स्पिनर भारतीय टी २० संघात दिसत नाहीये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news