IND vs SA T20 WC 24 Final : अंतिम सामन्यात नाणेफेकी का महत्वाची?, जाणून घ्या बार्बाडोसचा रेकॉर्ड

अंतिम सामन्यात नाणेफेकी का महत्वाची?
IND vs SA T20 WC 24 Final
वन-डे वर्ल्ड कपमध्ये भंगलेले स्वप्न साकारण्यापासून भारतीय संघ अवघे एक पाऊल दूर आहे.Toss File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क | IND vs SA T20 World Cup 2024 Final : वन-डे वर्ल्ड कपमध्ये भंगलेले स्वप्न साकारण्यापासून भारतीय संघ अवघे एक पाऊल दूर आहे. यामध्ये प्रथमच आयसीसीची फायनल गाठणारा द. आप्रिकेचा संघ उभा आहे. यामध्ये प्रथमच आयसीसीच्या फायनलमध्ये स्थान पटकावलेल्या द. आफ्रिकेला पराभूत करून भारतीय विजय साकारण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानामध्ये उतरेल. सामन्यामध्ये नेहमीच नाणेफेकीची भूमिका महत्वाची असते.

सामन्यात पावसाची शक्यता

बार्बाडोसमध्ये आज होत असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयसीसीने यापूर्वीच अंतिम सामन्यासाठी राखीव दिवशी ठेवला आहे. अशा परिस्थितीत सामन्यात नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची आहे.

IND vs SA T20 WC 24 Final
IND vs SA T20 WC 24 Final : सायमन गो बॅक...

कशी आहे बार्बाडोसमधील खेळपट्टी?

यापूर्वी बार्बाडोसमध्ये स्पर्धेतील 8 सामने खेळवले आहेत. बार्बाडोसमधील वैशिष्ट्य म्हणजे येथे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी खेळपट्टी उपयुक्त आहे. या मैदानामध्ये फलंदाजी दरम्यान संघानी मोठी धावसंख्या उभारली होती. या मैदानावर भारताने सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. बार्बाडोसमध्ये धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यात प्रथम खेळणाऱ्या संघाने 170 हून अधिक धावसंख्या उभी केली तर, विजयी धावसंख्या ठरू शकते.

IND vs SA T20 WC 24 Final
T20 World Cup Final : भारत की दक्षिण आफ्रिका? जगज्‍जेतेपदासाठी घमासान

नाणेफेक जिंकून काय करणे महत्वाचे?

बार्बाडोसमध्ये आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 19 सामने जिंकले आहेत तर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 10 सामने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावाची सरासरी 153 धावांची आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीत जो संघ नाणेफेक जिंकेल, प्रथम फलंदाजी करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

IND vs SA T20 WC 24 Final
T20 WC Final : भारत की द. आफ्रिका? फैसला आज

मैदानावरची 'ही' आहे सर्वाधिक धावसंख्या

या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध 5 बाद 224 अशी धावसंख्या उभारली होती. तर सर्वात कमी धावसंख्या अफगाणिस्तानने द. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 80 केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news