T20 WC Final : भारत की द. आफ्रिका? फैसला आज

आयसीसी टी-20 विश्वचषक जगज्जेतेपदासाठी आज घमासान युद्ध
IND vs SA T20 World Cup Final
टी-20 विश्वचषक स्पर्धा : अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे File Photo
Published on
Updated on

ब्रिजटाऊन-बार्बाडोस : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज भारत-दक्षिण आफ्रिका जेतेपदासाठी आमनेसामने भिडत असताना एकीकडे रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसारखे दिग्गज तर दुसरीकडे, एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडासारखे तगडे खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत असतील तर यात आश्चर्याचे कारण असणार नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही लढत रात्री 8 वाजता होणार आहे.

यंदा भारत व दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ अपराजित असून हीच विजयी घोडदौड कायम ठेवत जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा दोन्ही संघांचा इरादा असेल. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी 1998 मध्ये चॅम्पियन्स चषक जिंकली. ती त्यावेळी आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी या नावाने ओळखली जात असे. मात्र, इतका अपवाद वगळता या संघाला आजवर एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले असल्याने याचमुळे दक्षिण आफ्रिकेवर चोकर्सचा शिक्का बसला आहे. तो खोडून काढण्याचे त्यांचे आज लक्ष्य असेल.

IND vs SA T20 World Cup Final
Mumbai Metro : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोची सफर जुलैपासून

एरव्ही, दक्षिण आफ्रिकन खेळाडूंसाठी आयपीएल जेतेपद हाच सर्वात मोठा पराक्रम, असे समीकरण ठरत आले असले तरी येथे विश्वचषक जिंकता आला तर हा त्यांच्या कारकिर्दीतील अर्थातच सर्वोच्च क्षण असणार आहे. यापूर्वी भारतीय संघ गतवर्षी वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताचा एकतर्फी धुव्वा उडवला होता. जेतेपदाची ती कसर येथे भरून काढण्याचाही भारताचा प्रयत्न असणार आहे.

IND vs SA T20 World Cup Final
पिंपरीत मेट्रोची सफर रविवार दुपारपासून सुरु

शिवम दुबेला या स्पर्धेत फारसा सूर सापडला नसला तरी या महत्त्वाच्या लढतीत भारत मागील विजयी संघात बदल करणार का, हे पाहावे लागेल. शिवम दुबे येथे फिरकीपटू केशव महाराज व तबरेझ शम्सी यांना कसा सामोरे जाईल, यावर देखील बरीच समीकरणे अवलंबून असू शकतात.

गोलंदाजीच्या आघाडीवर भारताला जलद व फिरकी अशा दोन्ही आघाड्यांवर अजिबात चिंता नाही. भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेला सरावासाठी एक अतिरिक्त दिवस मिळाला आहे. शुक्रवारी त्यांनीही कसून सराव केला.

IND vs SA T20 World Cup Final
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? |शनिवार, २९ जून २०२४

दक्षिण आफ्रिकेची क्विंटन डी कॉक, हेन्ड्रिक्सवर भिस्त

या लढतीत क्विंटन डी कॉक व रिझा हेन्ड्रिक्स या दोन्ही सलामीवीरांवर दक्षिण आफ्रिकेची प्रामुख्याने भिस्त असणार आहे. सुपर-8 फेरीत कर्णधार एडन मार्कराम बड्या संघांविरुद्ध फारसा यशस्वी ठरला नव्हता, ही मात्र त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. हेन्रिच क्लासेनसारखा मर्यादित षटकातील विस्फोटक फलंदाज या संघात आहे. मात्र, त्यालाही भारतीय फिरकीपटूंचा बीमोड करण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागेल.

IND vs SA T20 World Cup Final
युजीसी-नेट फेरपरीक्षेच्या सुधारीत तारखा जाहीर

द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाची गोड सांगता होणे अपेक्षित

विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी प्रशिक्षक या नात्याने ही शेवटची स्पर्धा असेल. यामुळे आजच्या लढतीत जेतेपदावर शिक्कामोर्तब करत द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची यथोचित सांगता करण्याचा रोहितसेनेचा प्रयत्न असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news