Auqib Nabi NZ vs IND ODI Series: न्यूझीलंड विरूद्धच्या ३ वनडेसाठी भारतीय संघात मोठा बदल; नव्या वेगवान गोलंदाजाची एन्ट्री

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या संघाबाबतच्या नव्या घडामोडींची माहिती दिली.
Auqib Nabi NZ vs IND ODI Series
Auqib Nabi NZ vs IND ODI Seriespudhari
Published on: 
Updated on: 

Auqib Nabi NZ vs IND ODI Series: न्यूझीलंड विरूद्धची टी २० मालिका संपल्यानंतर ५ सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. निवडसमितीने आकिब नबी या वेगवान गोलंदाजाला टीम इंडियात सामील केलं आहे. यापूर्वी आकिबला मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी निवड केली होती. मात्र आता तो पूर्ण मालिका संघात असणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या संघाबाबतच्या नव्या घडामोडींची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी वेगवान गोलंदाज आकिब नबीची यापूर्वी शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती. मात्र आता तो पहिल्या तीन वनडे सामन्यासाठी देखील संघात असेल असे सांगितलं.

Auqib Nabi NZ vs IND ODI Series
Auqib Nabi : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात बुमराहच्‍या जागी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला संधी

पहिल्या तीन वनडेसाठी संघ बदलला

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्धच्या तीन वनडे सामन्यात खेळणार आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली सोबतच श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज गुरूनूर बरार आणि आता आकिब नबी यांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या वनडे सामन्यासाठी नीतीश कुमार रेड्डी देखील संघात असून बीसीसीआयच्या अपडेटनुसार तो फक्त पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा झाली त्यात नबीचा समावेश होता. या सामन्यात श्रेयस अय्यर कर्णधार होता. तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांना देखील संधी मिळाली आहे. पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी शुभमन गिल कर्णधार असणार आहे. चौथ्या आणि पाचव्या वनडेत ही जबाबदारी श्रेयस अय्यर सांभाळणार आहे.

Auqib Nabi NZ vs IND ODI Series
New Zealand Vs India Ticket: न्यूझीलंडमध्ये भारताविरूद्धच्या मालिकेची प्रचंड क्रेज... दोन दिवसात २६ हजार तिकीटे संपली

पहिल्या तीन सामन्यांसाठी वनडे संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, अक्षर पटेल, नमन धरी, अंशुल कंबोज, गुरनूर बरार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, आकिब नबी.

शेवटच्या दोन वनडे सामन्यासाठीचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बरार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंगं, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.

Auqib Nabi NZ vs IND ODI Series
IND vs NZ T20 : ऑकलंडमध्ये भारताचा दारुण पराभव; टी-२० इतिहासातील दुसऱ्या मोठ्या नामुष्कीची नोंद

भारत-न्यूझीलंड वनडे मालिका २०२६ चे वेळापत्रक:

पहिला वनडे: ४ नोव्हेंबर, बुधवार - इडन पार्क, ऑकलंड.

दुसरा वनडे: ७ नोव्हेंबर, शनिवार - हेनरी (Hnry) स्टेडियम, वेलिंग्टन.

तिसरा वनडे: १० नोव्हेंबर, मंगळवार - सेडन पार्क, हॅमिल्टन.

चौथा वनडे: १३ नोव्हेंबर, शुक्रवार - बे ओव्हल, माऊंट माउंगानुई.

पाचवा वनडे: १५ नोव्हेंबर, रविवार - बे ओव्हल, माऊंट माउंगानुई.

सामन्याची वेळ: सर्व सामने भारतीय वेळेनुसार (IST) सकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.