Auqib Nabi : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात बुमराहच्‍या जागी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला संधी

आकिबची राष्‍ट्रीय संघात निवड होण्‍याची पहिलीच वेळ
Auqib Nabi replaces injured Jasprit Bumrah
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे.Pudhari
Published on
Updated on

Auqib Nabi replaces injured Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याला संघात स्थान देण्यात आले आहे. आकिबची राष्ट्रीय संघात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुखापतीमुळे बुमराह मालिकेतून बाहेर

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान बुमराहच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तो या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी आकिब नबीचे नाव आघाडीवर होते.निवड समितीने जसप्रीत बुमराहचा पर्याय म्हणून आकिब नबीची निवड केली आहे. जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाला प्रथमच वरिष्ठ राष्ट्रीय संघात बोलावणे आले आहे," असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Auqib Nabi replaces injured Jasprit Bumrah
Jasprit Bumrah Injury Update : टीम इंडियाला मोठा धक्‍का! जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

सलग दोन रणजी हंगामात आकिबची दमदार कामगिरी

आकिब नबीने गेल्या दोन रणजी हंगामात एकूण १०४ बळी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेषतः २०२५-२६ च्या मोसमात त्याने ६० विकेट आपल्‍या नावावर केल्‍या. जम्मू-काश्मीरच्या संघाने ऐतिहासिक पहिल्यावहिल्या रणजी चषक विजेतेपदावर नाव कोरले. याशिवाय, नुकत्याच झालेल्या 'इंडिया ए'च्या श्रीलंका दौऱ्यातही त्याने दोन प्रथम श्रेणी सामन्यांत ६ बळी मिळवले होते.

पहिली कसोटी १५ ऑगस्‍टपासून

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही मालिका 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' (WTC) अंतर्गत खेळवली जात आहे.पहिली कसोटी: १५ ते १९ ऑगस्ट (गॉल) येथे तर दुसरी कसोटी: २३ ते २७ ऑगस्ट (कोलंबो) होणार आहे.

Auqib Nabi replaces injured Jasprit Bumrah
Lovlina Borgohain : "ही गोष्ट आम्हाला खूप वेदना देणारी!"; ग्लासगोतील रेस्टॉरंट मॅनेजमेंटला बॉक्सर लव्हलिनाने का सुनावले?

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news