New Zealand Vs India Ticket: न्यूझीलंडमध्ये भारताविरूद्धच्या मालिकेची प्रचंड क्रेज... दोन दिवसात २६ हजार तिकीटे संपली

New Zealand Vs India Ticket
New Zealand Vs India Ticketpudhari
Published on
Updated on

India Vs New Zealand: श्रीलंकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी आता टीम इंडियाच्या पुढच्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. भारत आता न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी क्रेज पहायला मिळत आहे. यजमान क्रिकेट बोर्डाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल अशी गोष्ट घडली आहे.

भारत न्यूझीलंड दौऱ्यावर विविध फॉरमॅटमध्ये एकूण १२ सामने खेळणार आहे. त्यासाठी तिकीट विक्री सुरू झाली असून फक्त ४८ तासात रेकॉर्ड ब्रेक तिकीट विक्री झाली आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या क्रिकेट नेशन प्री सेलमध्ये फक्त दोन दिवसात तब्बल २६ हजार तिकीटे विकली गेली आहेत.

New Zealand Vs India Ticket
IND vs SL 2nd Test : श्रीलंका पुन्‍हा पराभवाच्या छायेत, फॉलोऑननंतर दुसर्‍या डावात ६ बाद २२९ धावांपर्यंत मजल

ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. दौऱ्याच्या सुरूवातीलाच सामन्यांच्या तिकीटांना एवढी ऐतिहासिक मागणी निर्माण झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी जास्त क्रेज दिसून येत आहे.

ईडन पार्कसाठी सर्वाधिक मागणी

ऑकलँडचे प्रसिद्ध मैदान इडन पार्कसाठी सर्वाधिक तिकीट मागणी आहे. इथं मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी जास्त क्रेज पहायला मिळत आहे. त्याचबरोबर ख्राईस्टचर्च आणि वेलिंगटनवर देखील तिकीट खरेदीसाठी झुंबड आहे.

ख्राईस्टचर्चच्या हॅगली ओव्हलची प्रेक्षक क्षमता ९ हजार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या दोन टी २० सामन्यांसाठी तिकीटे लवकर हाऊसफुल होऊ शकतात. याच हॅगली स्टेडियमवर २७ नोव्हेंबर पासून १ डिसेंबरपर्यंत दुसरा कसोटी सामना होणार आहे.

New Zealand Vs India Ticket
IND vs SL 2nd Test Day 1: फलंदाजी करताना ऋषभ पंत मैदानातून बाहेर, नेमकं काय घडलं?

वेलिंगटनमध्ये देखील तिकीट विक्री जोरात

वेलिंगटन स्टेडियम देखील भारताविरूद्धच्या सामन्यात तिकीट विक्रीबाबत मागे नाही. तिसरा आंतरराष्ट्रीय टी २० आणि दुसरा वनडे सामना इथे खेळवला जाणार आहे. तर १९ नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना देखील खेळवला जाईल. या सामन्यांची तिकीट विक्री देखील सुरू झाली आहे. तिथे देखील तिकीटासाठी जोरदार मागणी आहे.

New Zealand Vs India Ticket
IND vs SL Test : यजमान श्रीलंका पराभवाच्‍या छायेत, ३७२ धावांचा पाठलाग करताना यजमानांची ४ बाद ८४ धावांपर्यंत जेमतेम मजल

आवाक्यातील तिकीट दर

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताविरूद्धच्या मालिकांसाठीचे तिकीट दर गेल्या हंगामासारखेच ठेवले आहेत. क्रिके नेशन एक्सेस कोडद्वारे उपलब्ध तिकीट ३० न्यूझीलंड डॉलरमध्ये उपलब्ध आहे. प्री - सेलमधील एका चाहत्याला १५ टक्के सूट देखील मिळत आहे. अजून सामान्य प्रेक्षकांसाठी तिकीट विक्री सुरू झालेली नाही. जनरल पब्लिक सेल ७ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच २६ हजार तिकीट विकले गेले आहेत. यावरूनच भारत - न्यूझीलंड मालिकेची न्यूझीलंडमध्ये किती क्रेझ आहे हे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news