NZ vs IND 2nd ODI Playing 11: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा लागणार कस; प्लेईंग ११ मध्ये होणार बदल, न्यूझीलंडचीही ताकद वाढणार

सिराज पहिल्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. आता तो संघात सामील झाला आहे.
NZ vs IND 2nd ODI Playing 11:
NZ vs IND 2nd ODI Playing 11pudhari
Published on: 
Updated on: 

NZ vs IND 2nd ODI Playing 11: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा वेलिंगटनमध्ये शनिवारी ७ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. पहिला सामना भारताने खिशात घालून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी दुसरा वनडे सामना हा तितकासा सोपा नाहीये. कारण न्यूझीलंडच्या संघात अव्वल वेगवान गोलंदाज मॅट हेन्री पुनरागन करत आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्याला मुकला होता.

NZ vs IND 2nd ODI Playing 11:
Virat Kohli NZ vs IND : 74*, 135, 102, 65* सातत्य हवं तर असं... विराटचा 'दस' का दम; 14 सामन्यात १० वेळा पन्नास पार

भारताच्या प्लेईंग ११ मध्ये बदल

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. सिराज आल्यामुळं अकिब नबीला बाहेर बसावे लागू शकते. सिराज पहिल्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. आता तो संघात सामील झाला आहे. सिराज परतल्यामुळं भारताच्या वेगवान माऱ्याची धार वाढली आहे.

NZ vs IND 2nd ODI Playing 11:
NZ vs IND Arshdeep Singh: श्रीनाथ अन् शमी नंतर 'अर्शदीप'च... न्यूझीलंडमध्ये केली मोठी कामगिरी, सामन्यावर भारताची पकड

रोहितकडे लक्ष

फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला येतील. पहिल्या वनडे सामन्यात रोहित शुन्यावर बाद झाला होता. आता तो दुसऱ्या सामन्यात काय करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येणार असून गेल्या सामन्यात त्याने ५१ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या. त्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

NZ vs IND 2nd ODI Playing 11:
NZ vs IND Arshdeep Singh: श्रीनाथ अन् शमी नंतर 'अर्शदीप'च... न्यूझीलंडमध्ये केली मोठी कामगिरी, सामन्यावर भारताची पकड

कशी असणार वेलिंगटनची खेळपट्टी

वेलिंगटनची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असेल अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. पहिल्या वनडे सामन्यात अर्शदीप सिंग, अंशुल कम्बोज आणि गुरनूर बरार यांनी चांगली कामगिरी केली होती. या तिघांनाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र ६ षटकात ३३ धावा देणाऱ्या आकिब नबीला एकही विकेट घेता आलेली नव्हती. अशा परिस्थिती त्याची प्लेईंग ११ मधील जागा जाऊ शकते. सिराज संघात परतल्यामुळं ही शक्यता अधिक बळावली आहे.

NZ vs IND 2nd ODI Playing 11:
Rohit Sharma Mumbai Indians Captain: हार्दिक पांड्याचा पत्ता कट? मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद

हेन्री परतला न्यूझीलंडची ताकद वाढली

न्यूझीलंड संघात देखील मोठे बदल होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे कन्कशनच्या कारणामुलं पूर्ण मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी निक केली याला संघात स्थान देण्यात आलं आहे. न्यूझीलंडसाठी दिलासादायक बाब म्हणजे त्यांचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री फिट झाला असून तो दुसऱ्या वनडे सामन्यात प्लेईंग ११ मध्ये येण्याची शक्यता आहे. जर त्याचा संघात समावेश झाला तर ब्लेयर टिकनरला बाहेर बसावं लागू शकते.

NZ vs IND 2nd ODI Playing 11:
Hardik Pandya Fitness: हार्दिक पांड्या आता थेट IPL 2027 मध्ये दिसणार; क्रिकेट सोडाच धावणेही आहे मुश्किल?

भारताची संभाव्य प्लेईंग ११ :

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कम्बोज, गुरनूर बरार, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग ११ :

टीम सैफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डेरिल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेम फिलिप्स, मिचेल सँटनर, नाथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.