Hardik Pandya Fitness: हार्दिक पांड्या आता थेट IPL 2027 मध्ये दिसणार; क्रिकेट सोडाच धावणेही आहे मुश्किल?

हार्दिक पांड्या आयपीएल २०२६ मध्ये दिसला होता. मात्र त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.
Hardik Pandya Fitness
Hardik Pandya FitnessPudhari
Published on: 
Updated on: 

Hardik Pandya Fitness: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये खेळला होता. हा फायनल सामना मार्च २०२६ मध्ये झाला होता. हार्दिक पांड्याने आपला आंतरराष्ट्रीय वनडे सामना मार्च २०२५ मध्ये खेळला होता.

हार्दिक पांड्या आयपीएल २०२६ मध्ये दिसला होता. मात्र त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. सध्या तो कधी मैदानावर परतणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांसोबत संघ व्यवस्थापनाला देखील लागली आहे.

Hardik Pandya Fitness
Gautam Gambhir On Hardik Pandya: हार्दिक पांड्याला सतत संघातून बाहेर का ठेवलं जातं... गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं

पूर्ण फिट होण्यास लागणार वेळ

मात्र मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या लवकर मैदानावर परतण्याची शक्यता पार कमी आहे. त्याला पूर्ण फिट होण्यासाठी अजून काही महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तो आता थेट आयपीएल २०२७ मध्येच दिसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

एका रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या पोटरीच्या स्नायूच्या दुखापतीने ग्रस्त आहे. सध्या तो बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ अक्सिलेन्समध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. हार्दिक पांड्याला सध्या क्रिकेट सोडा मात्र जॉगिंग करायलाच अजून ३ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे आठ आठवडे त्याचा रनिंग लोड हळूहळू वाढवण्यात येईल. त्यामुळं पांड्या मॅच फिट होण्यासाठी काही महिने लागू शकतात.

Hardik Pandya Fitness
Hardik Pandya : अनंत नंतर पंड्याने केले मुंडण, जाणून घ्या या मंदिरात केस दान करण्याची काय आहे परंपरा?

आयपीएल २०२७ मध्येच दिसणार?

हार्दिक पांड्या कधीपर्यंत पूर्ण मॅचफिट होईल याची कोणतीही डेटलाईन सेट करण्यात आलेली नाही. त्याची न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी निवड झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार १३ डिसेंबरपासून श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या मालिकेत देखील पांड्या खेळेल अशी शक्यता नाही. त्यानंतर भारत जानेवारीत झिम्बाब्वेसोबत ३ वनडे सामन्याची मालिका खेळणार आहे. तोपर्यंत पांड्या फिट होण्याची शक्यता नाही.

देशांतर्ग क्रिकेटचा मर्यादित षटकांच्या स्पर्धांचा देखील हंगाम संपला असून आता टीम इंडिया कसोटी मालिकांमध्ये जास्त खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल २०२७ चे आयोजन केले जाणार आहे. हार्दिक कसोटी क्रिकेट खेळत नाही. तसेच देशांतर्गत मर्यादित षटकांचा हंगाम संपल्यामुळं तो आता थेट आयपीएल खेळण्याची शक्यता आहे.

Hardik Pandya Fitness
Hardik Pandya IPL Trade: पांड्या KKR चं नशीब पालटणार.. शाहरूखच्या टीमचं MI सोबत 'डिलिंग', मात्र दोघात तिसऱ्याचीही एन्ट्री?

दुखापतीमुळे IPL डीलही लटकली

ज्यावेळी आयपीएल २०२६ संपुष्टात आलं त्यावेळी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा सुरू होती. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघासोबत त्याचे नाव जोडले जात होते. मात्र त्याच्या सततच्या दुखापतींमुळे कोणती डील क्रॅक होऊ शकलेली नाही असं दिसतंय. काही काळातच रिटेंशन देखील होईल. त्यात लक्षात येईल की मुंबईने त्याला रिटेन केले आहे की त्याचे कोणासाबोत ट्रेड झाले आहे हे पहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news