Virat Kohli NZ vs IND : 74*, 135, 102, 65* सातत्य हवं तर असं... विराटचा 'दस' का दम; 14 सामन्यात १० वेळा पन्नास पार

पहिल्या वनडे सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडला चांगलेच पाणी पाजले.
Virat Kohli NZ vs IND
Virat Kohli NZ vs INDpudhari
Published on: 
Updated on: 

Virat Kohli NZ vs IND : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने किवींना १८५ धावात रोखलं त्यानंतर विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली. भारताना पहिला वनडे सामना ५ विकेट्स राखून जिंकला. भारताने डीआरएस नुसार १४३ धावांचे आव्हान २२.४ षटकातच पार केलं. विराटने ७४ तर गिलने ३७ धावांची खेळी केली.

विशेष म्हणजे पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील आपले सातत्य पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. त्याने गेल्या १४ वनडे सामन्यात तब्बल १० वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Virat Kohli NZ vs IND
NZ vs IND Arshdeep Singh: श्रीनाथ अन् शमी नंतर 'अर्शदीप'च... न्यूझीलंडमध्ये केली मोठी कामगिरी, सामन्यावर भारताची पकड

विराट कोहलीचे सातत्य

भारताने न्यूझीलंडला १८५ धावात रोखल्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्माला भोपळाही न फोडता माघारी परतावे लागले. मात्र त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहलीने भारतीय फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेत दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची दमदार भागीदारी रचली. शुभमन गिलने ५६ चेंडूत ३७ धावा ठोकत विराटला चांगली साथ दिली. या भागीदारीमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला.

दरम्यान, विराट कोहलीने देखील आपले ८१ वे वनडे अर्धशतक पूर्ण करत आपलं सातत्य दाखवून दिलं. विराट कोहलीने गेल्या १४ वनडे सामन्यात १० वेळी अर्धशतकापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यातील चार अर्धशतके त्याने सलग ठोकली आहेत.

Virat Kohli NZ vs IND
IND Vs NZ Live Streaming: आता महागडे सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही... इथे पाहा फ्रीमध्ये भारत - न्यूझीलंड वनडे मालिका

डफीने टेन्शन दिले मात्र..

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर अर्शदीप सिंग (४), गुरनूर बरार(३), अंशुल कंभोज (२) यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव १८५ धावात संपुष्टात आला. त्यानंतर भारताने आपली फलंदाजी सुरू केल्यानंतर पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळं भारताचे १८५ धावांचे टार्गेट कमी होऊन ते १४३ धावांपर्यंत आलं.

रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर शुभमन गिल (३७) आणि विराट कोहली (७६४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचली. मात्र न्यूझीलंडच्या जेकब डफीने विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांना बाद करत भारताला टेन्शन देण्याचा प्रयत्न केला.

मात्र विजयाची औपचारिकताच राहिली होती ती केएल राहुल आणि नमन धीर यांनी पूर्ण केली. भारताने २२.४ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १४३ धावा करत पहिला वनडे सामना खिशात टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.