Rohit Sharma Mumbai Indians Captain: हार्दिक पांड्याचा पत्ता कट? मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद

Rohit Sharma Mumbai Indians Captain: आयपीएल 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma Mumbai Indians Captain
Rohit Sharma Mumbai Indians CaptainPudhari
Published on: 
Updated on: 

Rohit Sharma Mumbai Indians Captain: आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तब्बल तीन वर्षांनंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसू शकतात. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळत नसल्याने फ्रँचायझी पुन्हा रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, कर्णधारपदासाठी रोहित शर्माने सुरुवातीला युवा फलंदाज तिलक वर्माचे नाव सुचवले होते. मात्र, मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहितलाच कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केली. अखेर रोहित यांनीही या जबाबदारीसाठी होकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित शर्मासोबत कर्णधारपदाबाबत अनेकदा चर्चा केली. सुरुवातीला रोहित यांनी तिलक वर्माचे नाव पुढे केले होते. मात्र, फ्रँचायझीने त्यांनाच पुन्हा नेतृत्व करण्याची विनंती केली. न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीही यासंदर्भात अनेक बैठका झाल्याचे सांगितले जात आहे. नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती करतानाही रोहित यांचा सल्ला घेण्यात आला होता.

Rohit Sharma Mumbai Indians Captain
Rashid Khan T20 Record: आजपर्यंत कोणालाही जमलं नाही ते काम राशिद खानने केलं; टी २० मध्ये अफगाणी बादशाहत

रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. 2013 मध्ये त्यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यावेळी मुंबई इंडियन्सला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळाले नव्हते. मात्र, रोहित यांनी पहिल्याच वर्षी संघाला विजेतेपद मिळवून दिले.

2013 ते 2023 या काळात त्यांनी तब्बल 10 वर्षे मुंबईचे नेतृत्व केले. त्यांच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी एकूण पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली. त्यामुळे रोहित यांचे मुंबई इंडियन्सशी असलेले नाते खूप खास मानले जाते.

Rohit Sharma Mumbai Indians Captain
Rashid Khan T20 Record: आजपर्यंत कोणालाही जमलं नाही ते काम राशिद खानने केलं; टी २० मध्ये अफगाणी बादशाहत

सहा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ रोहित संपवणार?

मुंबई इंडियन्सने शेवटचे आयपीएल विजेतेपद 2020 मध्ये जिंकले होते. त्यानंतर संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. रोहित यांच्या नेतृत्वाखालीही संघाला सलग तीन वर्षे विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर 2024 च्या हंगामापूर्वी मुंबईने मोठा निर्णय घेत त्यांच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले.

मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखालीही संघाच्या कामगिरीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता फ्रँचायझी पुन्हा रोहित यांच्यावर विश्वास दाखवत असल्याची माहिती आहे.

रोहित शर्मा सध्या 39 वर्षांचे आहेत. अशा परिस्थितीत ते किती काळ संघाचे नेतृत्व करणार, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सूर्यकुमार यादवसारखा अनुभवी खेळाडू आणि तिलक वर्मासारखा युवा पर्याय उपलब्ध असतानाही मुंबईने रोहित यांच्यावर विश्वास दाखवल्याची चर्चा आहे. आता रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.