IND vs NZ Live Streaming : दुसरा एकदिवसीय सामना ‘फ्री’मध्ये कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत

IND vs NZ ODI Series : दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा निर्धार
IND vs NZ Live Streaming : दुसरा एकदिवसीय सामना ‘फ्री’मध्ये कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
Published on
Updated on

राजकोट : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा थरार राजकोटमध्ये रंगणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून, आता दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.

राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर हा महत्त्वाचा सामना खेळवला जाईल. पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजय संपादन केला होता. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला होता. आता दुसऱ्या सामन्यातही टीम इंडिया आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.

IND vs NZ Live Streaming : दुसरा एकदिवसीय सामना ‘फ्री’मध्ये कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
IND vs NZ उर्वरित 2 वनडे सामने कधी आणि कुठे? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

न्यूझीलंड पुनरागमनासाठी सज्ज

दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. पहिल्या सामन्यात किवी संघाच्या अनुभवी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती, मात्र त्यांना विजयाने हुलकावणी दिली. भारतीय संघाला त्यांच्याच मायदेशात रोखणे न्यूझीलंडसाठी सोपे नसले तरी, मालिका जिवंत ठेवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. या सामन्यातही क्रिकेटप्रेमींच्या नजरा कर्णधार रोहित शर्मा आणि 'किंग' विराट कोहलीच्या फलंदाजीवर खिळल्या आहेत.

IND vs NZ Live Streaming : दुसरा एकदिवसीय सामना ‘फ्री’मध्ये कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
KL Rahul vs Virat Kohli : राहुलचा तो एक षटकार अन् विराट कोहलीचा विक्रम मोडीत; आता केवळ धोनीच आहे पुढे

IND vs NZ: कधी आणि कुठे पाहाल सामन्याचे थेट प्रक्षेपण?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना १४ जानेवारी रोजी खेळवला जाईल. हा सामना राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर होणार आहे.

  • वेळ: दुपारी १:३० वाजता (नाणेफेक दुपारी १:०० वाजता होईल).

  • टीव्ही चॅनेल: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network).

  • लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर.

IND vs NZ Live Streaming : दुसरा एकदिवसीय सामना ‘फ्री’मध्ये कसा पाहाल? जाणून घ्या सोपी पद्धत
ind vs nz odi : क्रिकेटमध्‍येही 'भाषा'वाद...! भारत-न्यूझीलंड सामन्यावेळी नेमकं काय घडलं?

मोबाईलवर ‘फ्री’मध्ये 'LIVE' सामना पाहण्याची संधी

जर तुम्हाला हा सामना तुमच्या स्मार्टफोनवर विनामूल्य पाहायचा असेल, तर तुमच्याकडे जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) हे ॲप असणे आवश्यक आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय (केवळ डेटा खर्च करून) संपूर्ण सामन्याचा आनंद घेऊ शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news