Worst Test Captains: सचिन-लारा-कपिल ‘खराब कर्णधार’! आइसलँड क्रिकेटच्या धक्कादायक Playing XIने उडाली खळबळ; पहिल्या क्रमांकावर कोण?

Iceland Cricket Worst Test Captains Playing XI: आइसलँड क्रिकेटने टेस्ट क्रिकेटमधील तुलनेने कमी यशस्वी कर्णधारांची ऑल-टाइम प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
Iceland Cricket Worst Test Captains Playing XI
Iceland Cricket Worst Test Captains Playing XIPudhari
Published on
Updated on

Iceland Cricket Worst Test Captains Playing XI: आइसलँड क्रिकेटने टेस्ट क्रिकेटमधील तुलनेने कमी यशस्वी कर्णधारांची एक आगळीवेगळी ऑल-टाइम प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या यादीत भारताच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या शान मसूदला संघात पहिल्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे.

आइसलँड क्रिकेटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही यादी शेअर केली. या पोस्टमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अपेक्षेप्रमाणे यश न मिळवलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या माजी कर्णधारांना स्थान देण्यात आले आहे.

भारताच्या तीन दिग्गजांना स्थान

आइसलँड क्रिकेटच्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि बिशन सिंह बेदी यांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर यांना चौथ्या क्रमांकावर, कपिल देव यांना सातव्या क्रमांकावर, तर बिशन सिंह बेदी यांना दहाव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे.

सचिन तेंडुलकर हे फलंदाज म्हणून जगातील महान खेळाडूंपैकी एक मानले जातात. मात्र, कर्णधार म्हणून त्यांचा कार्यकाळ यशस्वी ठरला नाही. कपिल देव यांनी भारताला 1983 मध्ये विश्वचषक जिंकून दिला असला, तरी टेस्ट कर्णधार म्हणून त्यांच्या कामगिरीचा विचार या यादीत करण्यात आला आहे.

शान मसूदला पहिल्या क्रमांकावर स्थान

या अनोख्या यादीत पाकिस्तानचा सध्याचा टेस्ट कर्णधार शान मसूद पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार किम ह्यूजेस दुसऱ्या क्रमांकावर, तर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडचे माजी कर्णधार जॉन रीड यांना पाचवे स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडचे दिग्गज इयान बॉथम यांना सहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले असून, आइसलँड क्रिकेटने त्यांना या संघाचा कर्णधार आणि ‘सर्वात खराब कर्णधार’ म्हणून घोषित केले आहे.

पाकिस्तानचे तीन खेळाडू संघात

या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. शान मसूद आणि सरफराज अहमद यांच्यासह माजी कर्णधार इंतिखाब आलम यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

सरफराज अहमद यांना संघाचा यष्टिरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिटोरी यांनाही या संघात स्थान देण्यात आले आहे.

Iceland Cricket Worst Test Captains Playing XI
Team India Announcement : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; देवदत्त पडिक्कल-ऋतुराज गायकवाड ‘कॅप्टन’

आइसलँड क्रिकेटची ‘खराब कर्णधारांची’ प्लेइंग इलेव्हन

शान मसूद (पाकिस्तान), किम ह्यूजेस (ऑस्ट्रेलिया), ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), सचिन तेंडुलकर (भारत), जॉन रीड (न्यूझीलंड), इयान बॉथम (इंग्लंड - कर्णधार), कपिल देव (भारत), सरफराज अहमद (पाकिस्तान - यष्टिरक्षक), डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड), बिशन सिंह बेदी (भारत), इंतिखाब आलम (पाकिस्तान).

Iceland Cricket Worst Test Captains Playing XI
Ollie Robinson Record : ऑली रॉबिन्सनने कसोटीत रचला इतिहास; १०० वर्षांत बुमराहंनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसराच गोलंदाज

आइसलँड क्रिकेटची ही निवड मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या संघात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि कपिल देव यांसारख्या महान क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या कर्णधारपदाची तुलना त्यांच्या खेळाडू म्हणून केलेल्या कामगिरीशी करता येणार नाही, त्यामुळे या यादीवर क्रिकेट चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news