Shubman Gill Saliva Ban: SARS-CoV-2 चा नवा व्हेरियंट... गिलच्या चेंडूला लाळ लावण्याची परवानगी देण्यावर ICC ची भूमिका काय?

Shubman Gill Saliva Ban ICC Stance: शुभमन गिलने न्यूझीलंडविरूद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आयसीसीच्या एका नियमावर बोट ठेवलं होतं.
Shubman Gill Saliva Ban ICC Stance
Shubman Gill Saliva Ban ICC Stancepudhari
Published on: 
Updated on: 

Shubman Gill Saliva Ban ICC Stance: भारताचा कर्णधार शुभमन गिलने न्यूझीलंडविरूद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आयसीसीच्या एका नियमावर बोट ठेवलं होतं. त्याने चेंडूला लाळ लावण्यावर घातलेल्या बंदीमुळे गोलंदाजांना म्हणावा तसा फायदा मिळत नाही असा तर्क मांडला होता. त्याने कोरोना काळात तयार केलेला हा नियम रद्द करण्याची मागणी केली आहे.

याबाबत आयसीसी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र आयसीसीने याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. आयसीसी आपल्या जुन्या निर्णयावरच ठाम आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार खेळाडूंचे आरोग्य आणि क्रिकेटशी संबंधित काही कराणांमुळे चेंडूला लाळ लावणे योग्य ठरवलेलं नाही.

Shubman Gill Saliva Ban ICC Stance
Shubman Gill : शुभमन गिलने ‘सिक्स’ मारून पूर्ण केले अर्धशतक; तब्‍बल १२ वर्षांनंतर 'कॅप्‍टन इनिंग'ची प्रतीक्षा संपवली!

गिलची मागणी काय होती?

वेलिंगटन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर शुभमन गिलने चेंडूला लाळ लावण्याची परवानगी देण्याची वकिली केली होती. त्याने कूकाबुरा चेंडू हा लवकर मऊ होतो. त्यामुळे फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर गोलंदाजांना फार मदत मिळत नाही. जर चेंडूला लाळ लावून त्याची चकाकी टिकवून ठेवण्याची परवानगी मिळाली तर गोलंदाजांना थोडा फायदा होईल असं तो म्हणाला होता.

Shubman Gill Saliva Ban ICC Stance
Saliva Benefits | तोंडातील लाळेत दडलंय आरोग्याचे गुपित, डोळ्यांपासून जखमेवर रामबाण

आयसीसीने निर्णय बदलला नाही

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने या प्रकरणाबाबत सध्या तरी कोणता निर्णय बदलण्याचा निर्णय घेतलेला नाही. कोरोना महामारीच्या वेळी २०२० मध्ये खेळाडू आणि सामना अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी चेंडूला लाळ लावण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आयसीसीने हा बदल आपल्या नियमांमध्ये कायमचा समाविष्ट केला.

मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या क्रिकेट नियमांच्या अनुषांगानेच हा नियम तयार करण्यात आला आहे. एमसीसीच्या नियमानुसार चेंडूची स्थिती अयोग्य पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न चुकीचा ठरवण्यात आला आहे. आयसीसीच्या मतानुसार लाळेत मिठाई, च्युईंगम आणि मिंट सारख्या गोष्टी मिळवून चेंडूच्या स्थितीत मोठा बदल केला जाऊ शकतो. तसेच चेंडूवर लावण्यात येणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे आणि नियमांचे पालन करणे देखील अवघड होऊन जाते.

Shubman Gill Saliva Ban ICC Stance
New Zealand VS India 1st Test : जिंकणारा कसोटी सामना 'ड्रॉ' झाल्यानंतर कॅप्टन शुभमन गिलने दिले सिराजला वगळण्याचे उत्तर....

आयसीसीचा युक्तीवाद

आयसीसीच्या मतानुसार चेंडूवर लाळ लावण्याने खेळाडूंच्या आणि अंपायर, सामनाधिकारी यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. युरोपियन सेंटर फॉर डिजाईन प्रिवेंशन अँड कंट्रोल यांच्यानुसार SARS-CoV-2 च्या नव्या व्हेरियंटमुळे जगभारत आरोग्याबाबत धोका निर्माण झाला आहे. रिपोर्टनुसार या महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या आयसीसी बैठकीत चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्याच्या नियमाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात जर या नियमात बदल करायचा प्रस्ताव आला तर तो कोणत्या तरी सदस्य देशाकडून संबंधित आयसीसी समितीच्या समोर ठेवावा लागेल. समितीच्या शिफारशीनंतर आयसीसी अंतिम निर्णय घेईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.