Virat Kohli RCB Podcast: ‘आनंदी राहण्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले’, कोहलीने सोडले मौन; पॉडकास्टमध्ये केले गुपित उघड

RCB पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने एक आश्चर्यकारक खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याच्या करिअरच्या एका टप्प्यावर, त्याने संघ बदलण्याचाही विचार केला होता.
virat kohli rcb podcast
Published on
Updated on

rcb podcast : virat kohli reveals why he leave team india and rcb captaincy rcb podcast

बेंगळुरू : एक काळ असा होता जेव्हा विराट कोहली आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेट संघ आणि आरसीबीचे नेतृत्व करत असे. पण आता तो टीम इंडियाचा कर्णधार नाही आणि आयपीएलमध्ये बंगळुरूचे नेतृत्वही करत नाही. त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला हे आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हते. पण आता कोहलीने स्वतः हे गुपित आरसीबी बोल्ड डायरीज पॉडकास्ट कार्यक्रमातून उघड केले आहे.

कोहली म्हणाला की, मी सुमारे आठ ते दहा वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा आणि आरसीबीचा कर्णधार होतो. त्या काळात माझ्या नेतृत्वावर आणि फलंदाजीवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. पण काही काळानंतर मला वाटले की आता पुरे झाले, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.’

virat kohli rcb podcast
IPL Records : 20व्या षटकातील ‘सिक्सर किंग’ कोण आहे?

2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर, कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर तो आयपीएलमध्ये आरसीबीच्या कर्णधार पदावरून पायउतार झाला. तर सुमारे एक वर्षानंतर, कोहलीने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले होते.

virat kohli rcb podcast
Gavaskar criticized BCCI : धोनीसाठी 'IPL'मधील नियम बदलला? गावस्‍कर म्‍हणाले, "भारतीय क्रिकेट.."

‘आनंदी राहणे महत्त्वाचे’

कोहलीने सांगितले की, एक वेळ अशी आली होती की माझ्या कारकिर्दीत खूप काही घडत होते. जेव्हा जेव्हा मी फलंदाजीला जायचो तेव्हा माझ्याकडून खूप अपेक्षा असायच्या. त्यामुळे मला लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत होती. मला खूप संघर्ष करावा लागला. 2022 मध्ये मी सुमारे एक महिन्याचा ब्रेक घेतला आणि या काळात बॅटला हातही लावला नाही. एका क्षणी असे वाटू लागले की जर आपल्याला खेळात स्वतःला टिकवून ठेवायचे असेल तर आनंदी राहणे महत्त्वाचे आहे,’ अशी भावना व्यक्त केली.

virat kohli rcb podcast
Virat Kohli Avneet Kaur : कोहलीच्या ‘फोटो लाईक’ वादानंतर अवनीत कौरला लागली लॉटरी! इंस्टा पोस्टच्या दरात 30 टक्के वाढ

कोहली टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला आहे. असे असले तरी त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषक निश्चितच जिंकला आहे.

virat kohli rcb podcast
ICC Annual Rankings 2025 : वनडे, टी-20 मध्ये टीम इंडियाचा दबदबा! कसोटीत रोहितसेनेचे नुकसान, कांगारूंची मोठी झेप

धोनी आणि गॅरी कर्स्टन यांनी दिला आत्मविश्वास

पॉडकास्टमधील संभाषणादरम्यान कोहलीने त्याचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नावही घेतले. तो म्हणाला, ‘एमएस धोनी आणि गॅरी कर्स्टन यांनी मला भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा आत्मविश्वास दिला. मी अनेक मोठ्या आणि दिग्गज क्रिकेटपटूंना खेळताना पाहिले आहे, पण मला कधी वाटले नव्हते की माझा खेळ त्या दिग्गजांच्या जवळपास आहे. पण धोनी आणि कर्स्टन यांनी मला माझ्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचे स्थान योग्य असल्याचा आत्मविश्वास दिला.’

virat kohli rcb podcast
किंग कोहलीचा डंका.. ठोकले T20मध्ये स्पेशल ‘त्रिशतक’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news