रणजित गायकवाड
IPL 2025मध्ये विराट कोहलीने CSK विरुद्धच्या सामन्यात धमकेदार खेळी केली.
विराटने सलग चौथे अर्धशतक फटकावले. त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 33 चेंडूत 62 धावा चोपल्या.
या 5 षटकारांच्या जोरावर कोहलीने IPLच्या इतिहासात विशेष त्रिशतक झळकावले.
कोहली हा आयपीएलच्या इतिहासात एका फ्रँचायझीकडून खेळताना षटकारांचे त्रिशतक पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे.
विराट कोहलीच्या खात्यात RCBसाठी 300 हून अधिक षटकार जमा झाले आहेत.
IPLमध्ये एकाच संघाकडून खेळताना सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
विराट नंतर ख्रिस गेलचा नंबर लागतो. त्याने RCB साठी 263 षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा या यादीत तिस-या स्थानी आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी 262 षटकार मारले आहेत.
कॅरेबियन फलंदाज पोलार्डने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना 258 षटकार मारले आहेत.
CSK चा स्टार खेळाडू एमएस धोनी पाचव्या स्थानी आहे. त्याने चेन्नईसाठी 257 षटकार खेचले आहेत.