

Ind vs Sa 2nd T20 Match Date Time Venue Live Streaming: कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांच्या ऐतिहासिक विजयाने टी20 मालिकेची दमदार सुरुवात झाली. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. हार्दिक पंड्याची तुफानी खेळी आणि गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी यामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
आता मालिकेतील दुसरा सामना निर्णायक ठरणार असून, भारत हा सामना जिंकून आघाडी 2-0 करण्याच्या तयारीत आहे. तर दक्षिण आफ्रिका मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यामुळे मालिकेची पुढची दिशा ठरणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना
गुरुवार, 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.00 वाजता खेळला जाणार आहे.
टॉस 6.30 वाजता होणार आहे.
हा महत्वाचा सामना चंदीगडजवळील महाराजा यादविंदर सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लांपुर, येथे खेळला जाणार आहे. फास्ट आऊटफिल्ड आणि गोलंदाजांना मदत करणाऱ्या पिचमुळे हे मैदान दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. तसेच हा सामना JioCinema / JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे. सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, संजू सॅमसन, हर्षित राणा
क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेविड मिलर, डोनोवन फेरेरा, मार्को यान्सेन, केशव महाराज, लिथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्ट्जे, टोनी डी झॉर्ज़ी, कॉर्बिन बॉश, रीज़ा हेंड्रिक्स, ओटनील बार्टमॅन, क्वेना माफाका, जॉर्ज लिंडे
पहिल्या सामन्यात भारताचा एकतर्फी विजय पाहता मालिकेत टीम इंडिया पुढे आहे, पण दक्षिण आफ्रिकेची टीम त्यांच्या धडाकेबाज टी20 खेळासाठी ओळखली जाते. त्यामुळे मुल्लांपुरमध्ये दोन्ही संघांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.