

Abhishek Sharma Pakistan Google Trends 2025: भारतीय क्रिकेटचा स्टार अभिषेक शर्मा 2025 मध्ये सर्वात जास्त चर्चेत होता. भारतीय फॅन्स तर त्याच्या आक्रमक फलंदाजीचे चाहते झालेच, पण आश्चर्य म्हणजे पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनीही त्याला डोक्यावर घेतलं आहे. गूगल ट्रेंड्स 2025 नुसार, पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च झालेला खेळाडू म्हणजे भारताचा अभिषेक शर्मा. त्याने बाबर आजमसारख्या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.
अभिषेक शर्मा 2025 च्या एशिया कपमध्ये ‘गेम चेंजर’ ठरला. विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या दोन धडाकेबाज फलंदाजीमुळे त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली.
ग्रुप स्टेज: 13 चेंडूत 31 धावांची झंझावाती सुरुवात
सुपर-फोर: 39 चेंडूत 74 धावा, पाकिस्तानच्या गोलंदाजांना दणका
फाइनलमध्ये तो लवकर बाद झाला असला तरी टूर्नामेंटमध्ये त्याची सर्वात जास्त चर्चा होती.
भारताच्या विजयात त्याचा मोठा वाटा असल्याने त्याचे नाव पाकिस्तानातही सर्वाधिक चर्चेत राहिले.
गुगल रिपोर्टनुसार, अभिषेक पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च झालेला खेळाडू ठरला. त्याच्या मागोमाग हे खेळाडू होते:
हसन नवाज
इरफान खान नियाजी
साहिबजादा फरहान
मोहम्मद अब्बास
पण आश्चर्य म्हणजे बाबर आजमही या यादीत अभिषेकच्या मागे राहिला.
भारतामध्ये 2025 च्या सर्च यादीत अभिषेक टॉप-3 मध्ये होता.
अन्य लोकप्रिय सर्चमध्ये:
वैभव सूर्यवंशी: 13 व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण
प्रियांश आर्य: पंजाब किंग्जचा स्टार खेळाडू
महिला क्रिकेटमधून:
स्मृती मंधाना
जेमिमा रॉड्रिग्ज
यांनीही टॉप-10 मध्ये स्थान मिळवलं.
CSK च्या शेख राशिद, आयुष म्हात्रे आणि उर्विल पटेल या अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश ट्रेंडमध्ये दिसून आला.
भारताच्या ‘ओव्हरऑल’ टॉप सर्चमध्येही IPLचे स्थान अव्वल आहे. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये पाचपैकी चार टूर्नामेंट्स क्रिकेटच्या:
IPL
एशिया कप
चॅम्पियन्स ट्रॉफी
इतर मालिकांचा समावेश
तर प्रो-कबड्डी लीगने या सर्च लिस्टमध्ये पाचवे स्थान मिळवले.