Harmanpreet Kaur | स्वेच्छेने नेतृत्व सोडले की, 'बीसीसीआय'ने भाग पाडले ?

Harmanpreet Kaur captaincy - हरमनप्रीत कौर सर्व क्रिकेट प्रकारांतून कर्णधारपदावरून पायउतार, संघाला नव्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याची मंडळाची भूमिका
Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली/गुवाहाटी : वृत्तसंस्था
भारताला महिला क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विश्वचषक जिंकून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौरने मंगळवारी तिन्ही प्रकारांतील (कसोटी, वन-डे आणि टी-२०) कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मात्र, यानंतर तिने नेतृत्वावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली की यामागे 'बीसीसीआय'ची रणनीती आहे, यावरून वादंग निर्माण झाले. संघाला नव्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याची मंडळाची भूमिका होती. त्यावरून हरमनप्रीतने हा निर्णय घेतल्याचे प्रातिनिधिक चित्र आहे.

Harmanpreet Kaur
Virat Kohli: 5 कोटींच्या दाव्याने खळबळ! प्रेमानंद महाराज प्रकरणात विराट कोहली थेट मैदानात; दिलं सडेतोड उत्तर

एक कर्णधार म्हणून आपली जबाबदारी पूर्ण झाली असून, आता खेळावरील प्रेमापोटी केवळ एक खेळाडू म्हणून आपण सज्ज असल्याचे हरमनप्रीतने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट केले. ऐतिहासिक लॉर्डस् क्रिकेट मैदानावरील आपल्या छायाचित्रासह तिने ही पोस्ट शेअर केली.

गेल्या काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करत असलेली हरमनप्रीत कर्णधारपद सोडले तरी ती एक खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे. हरमनप्रीतने एकूण ५ कसोटी, ५१ एकदिवसीय आणि १५५ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.

Harmanpreet Kaur
Cristiano Ronaldo Retirement: मेस्सी सारखं करणार नाही... वादानंतरही रोनाल्डोची 'आंतरराष्ट्रीय' खेळण्याची इच्छा, शिक्षा भोगणार

स्मृती मानधना नवी कर्णधार

यादरम्यान, 'बीसीसीआय'ने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिच्या खांद्यावर सोपवली आहे. 'बीसीसीआय'ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्मृतीच्या निवडीची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटमधील आघाडीचा चेहरा राहिलेल्या स्मृतीने सर्वच क्रिकेट प्रकारांमध्ये संघाच्या यशात सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

बीसीसीआयच्या 'त्या' बैठकीत नेमके काय घडले?

संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी गुवाहाटी येथे 'बीसीसीआय'ची एक बैठक सचिव देवजित सैकिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. हरमनप्रीतसह उपकर्णधार स्मृती मानधना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार उपस्थित होते. याचवेळी 'बीसीसीआय'ने हरमनप्रीतला स्पष्ट केले की, भविष्याचा विचार करता संघात नेतृत्वात बदल करणे आवश्यक असून, निवड समितीही नव्या नेतृत्वाच्या बाजूने आहे. हरमनप्रीतने टी-२० मधील आपली फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे मान्य केले आणि नव्या पिढीला संधी देण्यासाठी बाजूला होणे योग्य ठरेल, अशी भूमिका घेतली. असे असले तरी, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद आपल्याकडेच राहावे, अशी तिची इच्छा होती; तर 'बीसीसीआय' मात्र तिन्ही प्रकारांत संपूर्ण नेतृत्वबदलाच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर हरमनप्रीतने मंडळाचा हा निर्णय स्वीकारला आणि अधिकृतपणे हा तिचा स्वतःचा निर्णय असल्याचे जाहीर केले.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे

२०१२ : मिताली राजच्या दुखापतीमुळे हरमनप्रीतने टी-२० आशिया चषक फायनलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व सांभाळले.

२०१८ : पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्याच टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले.

२०२० : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पहिल्यांदा टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली.

२०२२ : इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत भारताला पहिलावहिला 'क्लिन स्वीप' विजय मिळवून दिला.

२०२२ : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला अंतिम फेरीपर्यंत नेऊन रौप्य मिळवले. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुवर्णपदकाचा सामना गमावला).

२०२२ : इंग्लंडविरुद्ध नाबाद १४३ धावांची खेळी करून भारतीय कर्णधार म्हणून वन-डे सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम.

२०२३ : महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले.

२०२४ आणि २०२६: सलग दोन टी-२० विश्वचषकांमध्ये

भारतीय संघाला साखळी फेरीतच बाहेर पडावे लागले. ही तिच्या नेतृत्वाखालील निराशा करणारी अपवादात्मक बाजू.

२०२५ : इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका विजय मिळवून दिला.

२०२६ : २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी आणि १५० टी-२० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारी ती पहिली क्रिकेटपटू (पुरुष किंवा महिला).

॥ २०२६ : खेळाचा आनंद लुटण्यासाठी नेतृत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा.

२०२६ : कर्णधार हरमनप्रीतची जागा घेण्यासाठी स्मृती मानधना एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे येऊ शकते. गरज भासली तेव्हा मानधनाने अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. तसेच, गेल्या तीन हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दोन डब्ल्यूपीएल विजेतेपदेही जिंकून दिली. अगदी दशकभरापूर्वी मिताली राज नेतृत्व सांभाळत असताना हरमनप्रीतही अशाच भूमिकेत होती, हा ही एक योगायोगच!

स्मृती मानधना नवी कर्णधार यादरम्यान, 'बीसीसीआय'ने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिच्या खांद्यावर सोपवली आहे. 'बीसीसीआय'ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्मृतीच्या निवडीची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटमधील आघाडीचा चेहरा राहिलेल्या स्मृतीने सर्वच क्रिकेट प्रकारांमध्ये संघाच्या यशात सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news