Hardik Pandya : हार्दिक पांड्या 'पंजाब किंग्ज'मध्ये दाखल! कॅप्टन श्रेयस अय्यर आणि कोच पाँटिंगबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पंजाब किंग्जच्या ताफ्यात दाखल
Hardik Pandya Trade to Punjab Kings
Hardik Pandya Trade to Punjab Kings Pudhari News
Published on: 
Updated on: 

Hardik Pandya Trade to Punjab Kings : आयपीएलच्या २०२७ च्या हंगामापूर्वी क्रिकेट वर्तुळात एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला आहे. पंजाबच्या संघात समाविष्ट झाल्यानंतर हार्दिकने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया देत चाहत्यांचे आणि संघाचे लक्ष वेधून घेतले आहे.

१८ कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्‍जने हार्दिकला केले ट्रेड

पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सकडून १८ कोटी रुपयांच्या बोलीवर हार्दिक पांड्याला आपल्या संघात ट्रेड केले आहे. तर दुसरीकडे, पंजाबचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आता मुंबई इंडियन्सच्या गोटात सामील झाला आहे. अर्शदीपची १८ कोटींची विद्यमान रक्कम कायम ठेवत हा अदलाबदलीचा (ट्रेड) करार पूर्ण झाला असून, हार्दिकच्या मानधनात १६.३५ कोटींवरून १८ कोटींपर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती आयपीएल प्रशासनाकडून देण्यात आली.

Hardik Pandya Trade to Punjab Kings
Hardik Pandya Fitness: हार्दिक पांड्या आता थेट IPL 2027 मध्ये दिसणार; क्रिकेट सोडाच धावणेही आहे मुश्किल?

हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला खास संदेश

पंजाबच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर एक खास संदेश शेअर केला आहे. यामध्ये त्याने पंजाबचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचा विशेष उल्लेख केला."सत श्री अकाल! माझा कर्णधार श्रेयस, माझे प्रशिक्षक रिकी, माझा संघ आणि संपूर्ण पंजाब... मी तुमच्यासोबत आणि तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!"— हार्दिक पांड्या

Hardik Pandya Trade to Punjab Kings
Hardik Pandya Trade : हार्दिक पंड्या सोडणार मुंबई इंडियन्सची साथ, IPL 2027 पूर्वीच्या ‘डील’च्या चर्चांनी वेधले लक्ष

हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात

या मेगा ट्रेडमुळे हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. २०१५ मध्ये हार्दिक पहिल्यांदा मुंबईच्या संघात आला होता. २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० च्या विजेतेपदात त्याने मोलाचे योगदान दिले होते. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबईच्या ताफ्यात पुनरागमन करत त्याने रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.

Hardik Pandya Trade to Punjab Kings
Gautam Gambhir On Hardik Pandya: हार्दिक पांड्याला सतत संघातून बाहेर का ठेवलं जातं... गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं

हार्दिकच्‍या आयपीएलमध्‍ये २,९५५ धावा, ८२ विकेट्स

हार्दिकच्या आयपीएल कारकीर्दीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत १६२ सामन्यांमध्ये १४६.२८ च्या स्ट्राईक रेटने २,९५५ धावा केल्‍या आहेत. तसेच ८२ बळी (विकेट्स) देखील घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.