हालेप, जोकोविच सेमीफायनलमध्ये

हालेप, जोकोविच सेमीफायनलमध्ये

लंडन : रोमानियाची सिमोन हालेप, कजाकस्थानची इलिना रिबॅकिना यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत तर सर्बियाचा अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सिमोन हालेपने अमेरिकेच्या अ‍ॅमंडा अनिसीमोवा हिचा एकतर्फी पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. हालेपने आपल्या अनुभवाच्या बळावर अ‍ॅमंडाचा 6-2, 6-4 असा धुव्वा उडवत अंतिम चार खेळाडूंमधील स्थान निश्‍चित केले.

महिला गटातील दुसर्‍या एका सामन्यात कजाकस्थानच्या इलिना रिबॅकिनाने टॉमलजनोविकचा 4-6, 6-2, 6-3 असा पराभव करत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला. सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत यानिक सिनरचा पराभव करून पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. जोकोविचने पाच सेटपर्यंत लांबलेल्या चुरशीच्या सामन्यात यानिक सिनरला 5-7, 2-6, 6-3, 6-2, 6-2 असे पराभूत करून अंतिम चार खेळाडूंतील स्थान निश्‍चित केले. जोकोविचने सिनरला नमवून विम्बल्डनमध्ये सलग 26 व्या विजयाची नोंद केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news