ईशांत शर्मा करणार निवृत्तीची घोषणा? | पुढारी

ईशांत शर्मा करणार निवृत्तीची घोषणा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला सात विकेटने पराभव पत्करावा लागला. यामुळे ही मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील पहिले चार कसोटी सामने खेळणार्‍या वेगवान गोलंदाज इशांत शर्माला शेवटच्या कसोटीत टीम इंडियात संधी मिळाली नाही. पाचव्या कसोटीत ईशांतला असे काही बाहेर काढण्यात आले की, भविष्यात तो पुन्हा संघात पुनरागमन करूच शकणार नाही. यामुळे ईशांतसमोर आता निवृत्तीशिवाय दुसरा पर्यायच नाही, असे जाणकारांचे मत बनू लागले आहे.

ईशांत शर्माला सध्या टीम इंडियातून पूर्णपणे बाहेर करण्यात आले आहे. केवळ कसोटी प्रारूपात खेळणारा ईशांत सध्या अशा खडतर परिस्थितीतून वाटचाल करत आहे की, त्याला निवड समितीही भाव देईनाशी झाली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये इशांत हा प्रमुख गोलंदाज होता. मात्र, त्याला आता कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविडकडून संधी मिळेनाशी झाली आहे. तसे पाहिल्यास दीर्घकाळापासून ईशांत शर्मा अपयशीच ठरत आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना नागपूरमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

गेल्या काही काळापासून निवड समिती ईशांतला पहिली पसंद मानेनाशी झाली आहे. ईशांतऐवजी निवड समिती आता मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजला कसोटीत संधी देत आहे. चौथा गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर अथवा उमेश यादव यांचा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे ईशांतसाठी आता पुनरागमनाचे दरवाजे बंद झाल्यासारखेच चित्र दिसत आहे.

हेही वाचा

Back to top button