

Gambhir On Sanju Samson: भारताने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या तीन टी २० सामन्यांतील दोन सामने गमावल्यानंतर संघाच्या कॉम्बिनेशन आणि संघ निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये ९७, ८९ आणि ८९ धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला गेल्या दोन सामन्यात प्लेईंग ११ मधून वगळून वैभव सूर्यवंशीला संधी दिली होती. मात्र संजूला संघाबाहेर काढण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. वर्ल्डकप विनर खेळाडूला अशा प्रकारे बाहेरचा रस्ता दाखवणं कितपत योग्य आहे अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत आता गौतम गंभीरने खुलेपणानं आपलं म्हणणं मांडलं आहे.
इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यानंतर गंभीरने संजू सॅमसनबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संजूला अचानक संघातून वगळण्यात आलेलं नाही. त्याला याबाबत पूर्वकल्पना दिली होती आणि त्याच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा जाली होती.
गंभीर म्हणाला, 'संजूला जेवढं स्पष्ट सांगणं गरजचं होतं तेवढं सांगण्यात आलं आहे. मी त्याला स्पष्टता दिली आहे. हे संभाषण फक्त कोच आणि खेळाडू यांच्यामधील आहे. त्यामुळं याबाबत सार्वजनिकरित्या काही बोललं जाणार नाही.
मार्चमध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनने नॉक आऊट स्टेजमध्ये नाबाद ९७, ८९ आणि ८९ धावांची पाठोपाठ खेळी केली होती. त्याने भारताच्या वर्ल्डकप विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देखील मिळवला होता. आयपीएलमध्ये देखील त्याची बॅट तळपली होती.
मात्र आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत त्याला धावा करता आलेल्या नाहीत. त्याने गेल्या तीन सामन्यात ५, ० आणि १ धावा केली आहे. त्यानंतर संघाने १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं.
गौतम गंभीरने संघ निवड ही जुन्या कामगिरीच्या जोरावर नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या त्या खेळाडूचा फॉर्म कसा आहे यावर होते. टीमचे कॉम्बिनेशन देखील जास्त महत्वाचं आहे.
गंभीर म्हणाला, 'संजूने वर्ल्डकपमध्ये भारतासाठी जे काही केलं ते जबरदस्त होतं. मात्र कधी कधी खेळाडूचा सध्याचा फॉर्म देखील पहावा लागतो. याचा अर्थ तो पुनरागमनच करू शकणार नाही असा होत नाही.'
गंभीरने संजू सॅमसनला टीममधून बाहेर काढण्याचा निर्णय हा कायमचा नाहीये. म्हणजे संघ व्यवस्थापनाने संजूच्या पुरनागमनासाठीचे सर्व दरवाजे बंद केलेले नाहीत असे संकेत गंभीरने दिले आहेत.
गंभीरने निवडीबाबतच्या रणनितीबाबत स्पष्ट संदेश दिला आहे. ते म्हणाले की भारतीय संघात कोणत्याही खेळाडूची जागा ही कायमची नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्णयांचा खेळ असतो. जे कॉम्बिनेशन आम्हाला विजय मिळवून देऊ शकतो. ते कॉम्बिनेशन आम्ही खेळवतो.
गंभीरचे हे सुचक वक्तव्य अशावेळी आले आहे ज्यावेळी गतवेळच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सर्व प्रमुख चेहरे सध्या प्लेईंग ११ च्या बाहेर आहेत. फक्त संजू सॅमसन नाही तर सूर्यकुमार यादव देखील सध्याच्या संघात नाहीये.
गंभीरने सांगितलं की, ज्यावेळी एखादी टीम रिसेट होत असते त्यावेळी थोडा वेळ लागू शकतो. या संगाचा कर्णधार बदलला आहे. सलामी जोडी बदलली आहे. हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू नाहीयेत. १५ वर्षाचा मुलगा ओपनिंग करत आहेत. काही खेळाडू आपले सुरूवातीचे आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत. अशा वेळी थोडं धैर्य दाखवलं पाहिजे.