IPL 2026 Pitches Controversy | "६, ६, ६ बघणं कंटाळवाणं..." : IPL 2026 च्या खेळपट्ट्यांवर १३ कोटींचा स्टार खेळाडू भडकला!

IPL 2026 Pitches Controversy |वैभव सूर्यवंशीबाबतही केले मोठे विधान
IPL 2026 Pitches Controversy
इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू लिआम लिविंगस्टोन याने आयपीएल २०२६ मधील खेळपट्ट्यांवर (Pitches) जोरदार टीका केली आहे. Pudhari
Published on
Updated on

IPL 2026 Pitches Controversy :

मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू लिआम लिविंगस्टोन याने आयपीएल २०२६ मधील खेळपट्ट्यांवर (Pitches) जोरदार टीका केली आहे. सातत्याने होणारा धावांचा पाऊस काही काळानंतर 'खूपच कंटाळवाणा' वाटू लागतो, असा दावाही त्याने केला.

तब्बल १७ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग

आयपीएल २०२६ मध्ये २०० हून अधिक धावांचे विक्रमी स्कोअर पाहायला मिळाले, तसेच १७ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग यशस्वीरीत्या केला गेला. लिलावात सनरायझर्स हैदराबादने १३ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या लिविंगस्टोनने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याचे उदाहरण दिले. या सामन्यात हैदराबाद संघाने २४४ धावांचे आव्हान ८ चेंडू राखून पार केले होते. तो म्हणाला की, सीमारेषा बऱ्याच मोठ्या असल्या तरी सपाट खेळपट्ट्यांमुळे फलंदाजांना खूप मोठा फायदा मिळाला.

IPL 2026 Pitches Controversy
Sooryavanshi vs Tendulkar : वैभव सूर्यवंशीला ‘पुढचा सचिन’ का म्हणू नका, आरसीबीच्या प्रशिक्षकाचा महत्त्वाचा इशारा

"६, ६, ६ बघणं कंटाळवाणं"

'स्टिक टू क्रिकेट' (Stick To Cricket) या पॉडकास्टवर बोलताना लिविंगस्टोन म्हणाला, "आम्ही मुंबईविरुद्ध खेळत होतो आणि आम्ही २३० किंवा २४० धावांचा पाठलाग १८ षटकांतच केला. मला वाटलं की हे खरं तर खूपच कंटाळवाणं आहे. लोकांना फक्त ६, ६, ६ मारताना पाहणे... यात काहीच खरं कौशल्य दिसत नाही. खेळपट्ट्या एवढ्या सपाट होत्या आणि त्यात इम्पॅक्ट प्लेअर मैदानात येतो. सीमारेषा पुरेशा मोठ्या आहेत, पण खेळपट्ट्या पार सपाट आहेत. मुंबईत चेंडू हवेत थेट उडतो. हैदराबादमध्ये आम्ही एकाच खेळपट्टीवर कदाचित पाच किंवा सहा वेळा खेळलो."

IPL 2026 Pitches Controversy
Vaibhav Suryavanshi celebration |"ते काय होते हे मलाच...": वैभव सूर्यवंशीच्या 'त्‍या' सेलिब्रेशनवर नेमकं काय म्‍हणाला?

वैभवसारखा खेळाडू मी आजपर्यंत पाहिलेला नाही

लिविंगस्टोनने राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, "माझं हे आयपीएलमधलं ७ वं वर्ष आहे. या काळात मी अनेक दिग्गज खेळाडूंसोबत आणि त्यांच्याविरुद्ध खेळलोय, पण वैभवसारखा खेळाडू मी आजपर्यंत पाहिलेला नाही. तो खरोखरच थक्क करणारा आहे."

IPL 2026 Pitches Controversy
Vaibhav Suryavanshi |पाकिस्‍तानमध्‍येही वैभव सूर्यवंशीचा 'दरारा'; क्रिकेट विश्लेषक थेट म्हणाला, "खुदा न खास्ता..."

'अरे, याला नक्की बॉल टाकायचा तरी कुठे?'"

वैभव ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ते कमाल आहे. त्याचे शॉट्स अगदी कडक असतात आणि तो क्वचितच एखादा चुकीचा शॉट मारतो. स्पर्धेच्या सुरुवातीला आम्ही त्याला पहिल्याच बॉलवर बाउन्सर टाकून आऊट केलं होतं. पण त्यानंतर त्याने खेळात केलेली सुधारणा थक्क करणारी होती. नंतर आम्ही त्याला बाउन्सर टाकला की तो थेट षटकार मारायचा. आम्ही ऑफ साईडला बॉल टाकला की तो तिथे मारायचा, फुल लेंथ बॉल टाकला की समोर मारायचा आणि फुल टॉस बॉल टाकला की फ्लिक करायचा. शेवटी आम्ही बॉलरच चक्रावून गेलो आणि विचार करू लागलो, 'अरे, याला नक्की बॉल टाकायचा तरी कुठे?'", अशा शब्दांमध्ये त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news